• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

देवांश पाटीलची स्केटिंगमध्ये चमकदार कामगिरी; श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

पणजीतील नॅशनल मॅचेसमध्ये तीन पदकांची कमाई; जळगावात आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते सत्कार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 18, 2026
in जळगाव, Uncategorized, क्रीडा
देवांश पाटीलची स्केटिंगमध्ये चमकदार कामगिरी; श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगावचा चिमुकला स्केटिंगपटू देवांश प्रविण पाटील याने आपल्या वेगवान आणि दमदार कामगिरीच्या जोरावर स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गोवा येथील पणजीमध्ये नुकतेच झालेल्या नॅशनल मॅचेसमध्ये देवांशने तब्बल तीन पदकांची कमाई करत आपल्या शाळेसह जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

देवांश हा ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड येथे इयत्ता दुसरी (गोदावरी) मध्ये शिक्षण घेत आहे. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत त्याने स्पीड रेसमध्ये तृतीय क्रमांक मिळवत ब्राँझ मेडल, रिले रेसमध्ये प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड ट्रॉफी, तर स्केटॅथलॉनमध्ये द्वितीय क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल पटकावले.

श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

देवांशच्या या उल्लेखनीय कामगिरीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे त्याची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे देवांशच्या यशाकडे जळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब म्हणून पाहिले जात आहे. लहान वयातच राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेची संधी मिळाल्याने देवांशच्या कुटुंबीय, शिक्षक, प्रशिक्षक आणि मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते सत्कार

देवांशच्या या यशाबद्दल आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवांशचे वडील प्रविण संतोष पाटील, आई प्रियंका प्रविण पाटील, आजी वंदना पाटील, ॲड.अरविंद पाटील, ॲड.सी.आर.पाटील तसेच प्रशिक्षक संजय पाटील उपस्थित होते.

यावेळी ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्डच्या वतीने प्राचार्य श्रीधर सूनकारी, उपप्राचार्या रजनी गोजेरेकर मॅडम, वर्गशिक्षिका चित्रा पाटील मॅडम आणि स्पोर्ट शिक्षिका प्रमिला बागुल यांनी देवांशचे अभिनंदन केले.

तसेच ट्युशन क्लासच्या शिक्षिका स्वाती राहुल गोलेचा, प्राजक्ता चिंतामणी वैद्य आणि हर्षाली विनोद अनपट यांच्यासह परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांनी देवांशला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई आणि आता थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेची संधी मिळालेल्या देवांशकडून श्रीलंकेतील स्पर्धेतही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत असून, त्याच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: गोवाजळगावदेवांश प्रवीण पाटीलनॅशनल स्केटिंगपणजीस्केटिंग स्पर्धा
Previous Post

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

Next Post

केसीई वर्धापन दिनानिमित्त शालेय एकपात्री नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

केसीई वर्धापन दिनानिमित्त शालेय एकपात्री नाट्यछटा स्पर्धा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

October 15, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif