• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महात्मा फुले मार्केटमधील ओट्यांचे अतिक्रमण मोजमाप करूनच हटवा

महापौर दीपमाला काळे यांचे अतिक्रमण विभागाला स्पष्ट निर्देश व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली महापौरांची भेट

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 12, 2026
in जळगाव, स्थानिक बातम्या
महात्मा फुले मार्केटमधील ओट्यांचे अतिक्रमण मोजमाप करूनच हटवा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव :महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमधील दुकानांबाहेरील ओट्यांचे अतिक्रमण निष्कासित करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावित कारवाईच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (९ सप्टेंबर) महापौर दीपमाला काळे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या वेळी महापौरांनी अतिक्रमण विभागाला सर्व दुकानांचे अधिकृत मोजमाप करून नियमाबाहेरील अतिक्रमणच हटवण्याचे निर्देश दिले, तसेच रस्त्यावरील हॉकर्सवरही समान कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

भेट प्रसंगी भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, स्वीकृत नगरसेवक रमेश मतानी, मनपा उपायुक्त पंकज गोसावी, अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर, गौरव सपकाळे यांच्यासह महात्मा फुले मार्केटचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चेदरम्यान व्यापाऱ्यांनी महापौरांसमोर आपली भूमिका मांडताना सांगितले की, महापालिका प्रशासन अतिक्रमण काढताना व्यापाऱ्यांना एक नियम लावते आणि रस्त्यावर बसणाऱ्या हॉकर्सला वेगळा नियम लावते. महापालिका प्रशासनाकडून चाललेल्या या दुजाभावाबद्दल व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी तत्काळ महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर अतिक्रमण विभागाचा प्रभार असलेले उपायुक्त पंकज गोसावी यांना महापौर दीपमाला काळे यांनी निर्देश दिले.

फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या जागांचे रीतसर मोजमाप करण्यात यावे. अधिकृत मोजमापाच्या बाहेर जे भाग असतील, तेच अतिक्रमण मानून हटवण्यात यावेत. दुकानदारांनी कपड्यांचे पुतळे किंवा इतर उत्पादनांचे नमुने दुकानाबाहेर टांगू नयेत, सर्व साहित्य दुकानाच्या आतच ठेवावे. रस्त्यावर किंवा आडोशाने अतिक्रमण करणाऱ्या हॉकर्सवरही कोणतीही सवलत न देता कारवाई करण्यात यावी, अशा सूचना महापौर दीपमाला काळे यांनी दिल्या.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचा परिसर पूर्णपणे स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त राहावा याची काळजी घ्यावी. महात्मा फुले मार्केट येथील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली असून त्यांची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण करण्याबाबतही महापौरांनी आयुक्तांशी चर्चा केली. व्यापाऱ्यांच्या सर्व समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी लवकरच महात्मा ज्योतिबा फुले मार्केटला वैयक्तिक भेट देऊन पाहणी करणार असल्याचे आश्वासन महापौर दीपमाला काळे यांनी व्यापाऱ्यांना दिले.

बातमी शेअर करा !
Tags: अतिक्रमणअतिक्रमण कारवाईजळगावजळगाव महापालिकादीपमाला काळेमहात्मा फुले मार्केट
Previous Post

पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

Next Post

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 16, 2026
पारोळा तालुक्यात ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण करून खून; ४० दिवसांनी LCBकडून संशयित आरोपी जेरबंद

पारोळा तालुक्यात ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण करून खून; ४० दिवसांनी LCBकडून संशयित आरोपी जेरबंद

September 14, 2026

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

September 16, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 15, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif