• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव शहरात १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान पर्यावरण महोत्सवाचे आयोजन

स्वच्छ व हरित जळगावसाठी महापौर दीपमाला काळे यांचे नागरिकांना आवाहन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 7, 2026
in जळगाव, Uncategorized, पर्यावरण
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :जळगाव शहर महानगरपालिका, नाशिक येथील ‘हिरवांकुर संस्था’ आणि जळगावच्या ‘ग्रीन सिटी फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात येत्या १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान विविध पर्यावरणपूरक उपक्रम व प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सविस्तर माहिती देण्यासाठी आज, गुरुवारी महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, “हा महोत्सव केवळ एक प्रदर्शन नसून ही पर्यावरण संवर्धनाची एक मोठी चळवळ आहे. जळगाव शहर स्वच्छ आणि हरित राहावे यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेत सर्व जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा.”

सायकल रॅली, वृक्षदिंडी अन् पर्यावरण प्रदर्शन !

या पाच दिवसीय महोत्सवाच्या रूपरेषेबद्दल माहिती देताना महापौरांनी प्रमुख बाबी मांडल्या. उद्घाटन बुधवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नूतन मराठा महाविद्यालय येथे या महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन होईल. उद्घाटनापूर्वी शहरातून जनजागृतीसाठी भव्य सायकल रॅली आणि वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. १२ ते १६ ऑगस्टदरम्यान हे पर्यावरण प्रदर्शन सर्व नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

“इंदूर शहराची ओळख जशी देशातील ‘सर्वात स्वच्छ शहर’ म्हणून आहे, त्याच धर्तीवर आपल्या जळगाव शहरालाही स्वच्छ आणि सुंदर बनवायचे असेल, तर प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वांनी आपले घर आणि परिसर स्वच्छ राहील यासाठी पुढाकार घ्यावा.”

— दीपमाला काळे, महापौर, जळगाव महापालिका

या पत्रकार परिषदेला नाशिक येथील हिरवांकुर फाउंडेशनचे प्रमुख निलयबाबू जैन शाह, जळगाव ग्रीन सिटीचे संचालक विजयकुमार वाणी, नलिनी शाह आणि कांचन वाणी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या अनोख्या पर्यावरण महोत्सवात शाळा-कॉलेजचे विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव महानगरपालिकादीपमाला काळेपर्यावरण महोत्सवस्वच्छ जळगावहरित जळगाव
Previous Post

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले

Next Post

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

October 18, 2026
श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 16, 2026
जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

October 15, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

October 15, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif