• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगाव भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा सापळा; भूकरमापक ७१ हजार ७०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

शेतजमिनीच्या मोजणी व पडताळणीच्या कामासाठी लाचेची मागणी; डेटा एन्ट्री ऑपरेटरचाही सहभाग, जळगाव एसीबीची धडक कारवाई.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 29, 2026
in क्राईम
जळगाव भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा सापळा; भूकरमापक ७१ हजार ७०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : येथील उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक राहुल ताराचंद कोळी याला ७१ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. या प्रकरणात कार्यालयातील डेटा एन्ट्री ऑपरेटर कल्पेश सोमनाथ पाटील याचाही सहभाग समोर आला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

तक्रारदाराच्या शेतजमिनीची मोजणी करून गट हिस्सा व पोट हिस्सा पडताळणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्रस्ताव होता. या कामासाठी आरोपी राहुल कोळी याने सुरुवातीला ७० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने १७ जुलै २०२६ रोजी एसीबीकडे केली होती. त्यानंतर पडताळणीदरम्यान आरोपीने मोजणीची नोटीस पाठविण्यासाठी ६२५ रुपयांच्या स्टॅम्पची मागणी केली. तसेच मोजणीच्या दिवशी पुन्हा स्वतःसाठी व कार्यालयाच्या नावाखाली ७० हजार रुपये, दोन वेळच्या नोटीससाठी १,२०० रुपये आणि खाजगी मदतनीसासाठी ५०० रुपये, अशी एकूण ७१ हजार ७०० रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

 

आज (२९ जुलै) जळगाव तालुक्यातील kara बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपी राहुल कोळी याने लाचेची ७१ हजार ७०० रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक योगेश आकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Tags: Acbअटकक्राईमगुन्हालाचलाचखोर
Previous Post

जळगाव शहरातील नाल्यांच्या तुटलेल्या कठड्यांवर तात्काळ उपाययोजना करा!

Next Post

प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे… महापौर श्री पंत मंदिर येथे

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे… महापौर श्री पंत मंदिर येथे

प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे... महापौर श्री पंत मंदिर येथे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif