• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवा : मान्यवरांचे आवाहन

उपमहापौर मनोज चौधरी,स्थायी समिती सदस्य विशाल भोळे व डॉ. निलेश चांडक यांची उपस्थिती :  प्रशांत सरळकर आयोजित शालेय उपक्रम १५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 27, 2026
in जळगाव, सामाजिक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

 

जळगाव: आपण समाजात राहतो, त्यामुळे समाजाचे काहीतरी देणे लागतो. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरेश सुरळकर यांनी मातोश्री बेबीबाई सुरेश सुरळकर यांच्या प्रेरणेतून रविवारी, २६ जुलै रोजी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमात तब्बल १५०० मुला-मुलींना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

हा उपक्रम जैन इरिगेशन सिस्टीम, अण्णासाहेब सागरमल सांखला सोसायटी, रोहित कन्स्ट्रक्शन, नंदिनी ट्रेडिंग कंपनी आणि तरुण कुढापा मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने पार पडला. यंदाचे हे आठवे वर्ष आहे. या सोहळ्याला उपमहापौर मनोज चौधरी, शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक शरद तायडे, मनपाचे स्थायी समिती सदस्य विशाल भोळे, अण्णासाहेब साखला पतसंस्थेचे चेअरमन सुभाषजी सांखला, जैन इरिगेशनचे अधिकारी अनिल जोशी, डॉ. निलेश चांडक, सामाजिक कार्यकर्ते शोएब खाटीक, राजकुमार वाणी, मातोश्री बेबीबाई सुरळकर, मुन्ना परदेशी, राजेंद्र पाटील, सरला चौधरी, संगीता सूर्यवंशी, निर्मला चौधरी, रामचंद्र चौधरी, सुभाष चौधरी, अलका सोनवणे आणि निलेश देशमुख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक करताना प्रशांत सुरळकर यांनी, समाजातील गरजू घटकांना मदत करणे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

 

*जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवा : मान्यवरांचे आवाहन*

 

तुमच्यातील शिकण्याची आवड आणि जिद्दच तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाईल. ज्ञानाची ज्योत पेटत राहो आणि अभ्यासाची कवाडे उघडत राहो… तुमच्या प्रत्येक पावलाला यशाची साथ मिळो,” अशा शब्दांत उपमहापौर मनोज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणतीही परिस्थिती यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही. हे शालेय साहित्य तुमच्या अभ्यासाच्या प्रवासात नवीन ऊर्जा आणि दिशा देईल, असा विश्वास शरद तायडे (महानगर प्रमुख व नगरसेवक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्वल करावे 

विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून आपल्या कुटुंबाचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य विशाल भोळे यांनी केले. यासोबतच पर्यावरणाचे भान ठेवून प्रत्येकाने वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

 

याप्रसंगी डॉ. निलेश चांडक व माजी अधीक्षक राजकुमार वाणी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रोहिणी सुरळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुन्ना मराठे, भैय्या ठाकूर, अनिल ठाकूर, सुभाष जंगले, प्रकाश चौधरी, राहुल चौधरी, योगेश पाटील, दीपक ठाकूर, कल्पेश बनवे, यश चौधरी, नारायण कोळी, चंद्रकांत सोनवणे, रवींद्र लुले, निलेश पाटील, हितेश वाणी, कन्हैया चौधरी, निलेश कोळी, संदीप चौधरी, भूषण चौधरी, सचिन भावसार, वैभव सूर्यवंशीसंदीप भावसार, पंकज भावसार, पवन भावसार, सचिन चौधरी, शंभू भावसार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Tags: गरजू विद्यार्थ्यांना मदतजळगावजळगाव बातम्याप्रशांत सुरळकरबेबीबाई सुरळकरशालेय साहित्य वाटप
Previous Post

जळगांव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनिल भंगाळे यांची आठव्यांदा बिनविरोध निवड..

Next Post

मविप्र बनावट लेटरहेड प्रकरणी ॲड. विजय पाटील यांना अटक

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मविप्र बनावट लेटरहेड प्रकरणी ॲड. विजय पाटील यांना अटक

मविप्र बनावट लेटरहेड प्रकरणी ॲड. विजय पाटील यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif