• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

दिंडी, पालखी, नाटिकेतून वारकरी संस्कृतीची ओळख; ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा हरित संदेश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 25, 2026
in जळगाव, Uncategorized, शैक्षणिक
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (प्रायमरी) व अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल (सेकंडरी) येथे दिंडी सोहळा आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी व दिंडीत सहभागी होत प्रत्यक्ष वारीचा आनंद अनुभवला.

यावेळी विद्यार्थ्यांनी “पंढरीचा पांडुरंग विटेवर का उभा आहे?” या विषयावर आधारित विशेष नाटिका सादर केली. या नाटिकेतून वारकरी संप्रदायाचा इतिहास, संत परंपरा, भक्ती आणि विठ्ठलभक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. शाळेच्या प्राचार्या रेश्मी लाहोटी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना पालखी, दिंडी आणि वारीचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची ओळख करून देतानाच भक्ती, समता, सेवा आणि संस्कार यांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. यंदाच्या दिंडी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा संदेश.

 

दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” चा जयघोष करत हरित पर्यावरणाची जनजागृती केली. भक्तीबरोबरच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

अनुभूती स्कूल च्या संचालिका निशा जैन, प्राचार्य रेश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर सोनवणे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. वारीची अनुभूती देणारी नाटिका वैशाली दुसाने यांनी साकारली, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री कासार यांनी केले. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने आणि भक्तिरसाने संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

बातमी शेअर करा !
Tags: अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलअनुभूती स्कूलआषाढी एकादशीजळगावदिंडी सोहळापालखी सोहळा
Previous Post

आषाढी एकादशीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालयाच्या दिंडी नृत्याला प्रथम क्रमांक

Next Post

भक्तिरस आणि पर्यावरण संवर्धनाचा दुहेरी संदेश ; आषाढी एकादशी व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भक्तिरस आणि पर्यावरण संवर्धनाचा दुहेरी संदेश ; आषाढी एकादशी व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

भक्तिरस आणि पर्यावरण संवर्धनाचा दुहेरी संदेश ; आषाढी एकादशी व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif