नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात खानदेश केटरिंग असोसिएशनच्या प्रमुख पुढाकाराने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सर्वसामान्य नागरिकांसाठी जनरल मेडिसिन, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी, हृदयरोग, अस्थिरोग तसेच जनरल सर्जरी आदी विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.
या उपक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव, उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य लाभले. यावेळी आयोजित महारक्तदान शिबिरात १११ जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केले.
या ठिकाणी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमालाताई काळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन खांदेश केटरिंग असोसिएशन, जळगाव, भाजप महानगर, जळगाव आणि जीएम फाउंडेशन जळगाव, गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख पितांबर भावसार, भैया पाटील, कल्पेश बेलदार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
रतन सारस्वत, दिनेश टाटिया, सत्यनारायण जोशी, महेंद्र टाडा, गोपाल अग्रवाल, मोहन मेवाड, महाराज रामचंद ताडा, गोपाल व्यास यांच्यासह खान्देश केटरिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले .



