नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संचलित जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारिणी कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये जळगाव जिल्हा अध्यक्षपदी *श्री.गणेश वंडोळे* यांची तर जिल्हा सचिवपदी *श्री.पंकज वराडे* यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण या विषयाच्या प्रगतीसाठी व शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे विविध प्रश्न सोडवणूकीसाठी या महासंघाच्या माध्यमातून राज्यभर कार्यकारिणीची निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्याची निवड सभा नुकतीच पार पडली. सदर निवड प्रक्रिया महासंघाचे संस्थापक श्री. संदीप मनोरे, राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे
श्री. गणेश वंडोळे यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष पदी मा. सौ.कांचन विसपुते श्री. प्रा. खुशाल देशमुख यांची तर कार्याध्यक्ष पदी श्री.विजय पाटिल सचिवपदी.श्री.पंकज वराडे सहसचिव पदी श्री.आकाश धनगर श्री. सैयद अली खजिनदारपदी श्री.सागर सोनवणे जिल्हा संघटकपदी श्री. अमर हटकर श्री. विनोद वंडोळे श्री. किशोर भोई श्री. राकेश धनगर श्री. सुरेश महाजन श्री. प्रमोद धनगर यांची निवड झाली आहे. तसेच जळगाव जिल्हा सदस्य श्री. मुकुंद शिरसाठ श्री. प्रशांत सपकाळे श्री. रवींद्र महाजन श्री. तन्मय गायकवाड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री. प्रवीण मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे संचलित महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या कार्यकारणींची निवड प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये जळगाव जिल्हा कार्यकारणी नुकतीच पार पडली.
कार्यकारणीची निवड प्रक्रिया महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री.संदिप मनोरे व सचिव प्रा.तायाप्पा शेंडगे व सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. निवड झालेल्या नूतन कार्यकारणीचे जिल्ह्यातील शिक्षण क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.






