नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ७ जुलै २०२६ जळगाव :महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ७ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ गुरुवार (दि. २३ ) रोजी सकाळी जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, जिल्हापेठ येथे उत्साहात पार पडले. विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देणे, योजनांची माहिती देणे तसेच लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे व लाभांचे वितरण करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता.
रोजीच्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ गुरुवार (दि. २३ जुलै) रोजी सकाळी १० वाजता जळगाव शहर महानगरपालिकेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, जिल्हापेठ येथे उत्साहात पार पडले. विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देणे, योजनांची माहिती देणे तसेच लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे व लाभांचे वितरण करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता.
शिबिराचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, गटनेते प्रकाश बालाणी आणि शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी तहसीलदार शीतल राजपूत, महिला व बालकल्याण सभापती सिंधुताई कोल्हे, उपायुक्त (सामान्य प्रशासन) निर्मला गायकवाड, उपायुक्त (महसूल) पंकज गोसावी, सहाय्यक आयुक्त संजय राऊत, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका व शहरस्तरीय शासकीय अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये जळगाव महानगरपालिकेच्या DAY-NULM योजनेअंतर्गत तीन बचत गटांना कर्ज मंजुरी देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला, तर २० लाभार्थ्यांना बांधकाम परवानगीचे वाटप करण्यात आले. जन्म-मृत्यू नोंदणी विभागामार्फत ४२ नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले वितरित करण्यात आले.
दवाखाने विभागामार्फत ५० नागरिकांना आयुष्मान भारत कार्डांचे वितरण करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ७३, श्रावणबाळ योजनेअंतर्गत १९५, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेअंतर्गत १ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत ३७ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण व दिव्यांग विभागामार्फत ३२ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. जळगाव व मेहरूण तलाठी कार्यालयामार्फत ९ उत्पन्न दाखले, १९ जात प्रमाणपत्रे, ८ नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रे आणि ५ अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिक्षण विभागामार्फत २२ लाभार्थ्यांना विविध शैक्षणिक योजनांची माहिती देण्यात आली.
शिबिराच्या ठिकाणी विविध शासकीय विभागांनी माहितीपर व जनजागृतीपर प्रदर्शनीय स्टॉल उभारले होते. नागरिकांनी विविध योजनांविषयी माहिती घेत शासकीय सेवांचा लाभ घेतला.
शासनाच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन अत्यंत उपयुक्त असल्याचे मत जिल्हाधिकारी रोहन घुगे, आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री पाटील व मोनाली लांगरे यांनी केले, तर आभार गायत्री पाटील यांनी मानले.




