• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या संस्थेतील ४.८५ कोटींच्या अपहारप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

कथित अपहारप्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय; तपासाच्या दृष्टीने गंभीर बाबींचा विचार करत फेटाळला जामीन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 19, 2026
in जळगाव, क्राईम
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या संस्थेतील ४.८५ कोटींच्या अपहारप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या ‘श्रीकृष्ण शैक्षणिक वजळगाव : माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या ‘श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ’ या संस्थेतील कथित ४ कोटी ८५ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी आरोपी लोकेश उर्फ चेतन कोल्हे याचा अटकपूर्व जामीन जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.या प्रकरणात संस्थेत कार्यरत असलेल्या लोकेश उर्फ चेतन कोल्हे याने संगणकीय नोंदींमध्ये फेरफार करून संस्थेचा सुमारे ४ कोटी ८५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. याबाबत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी स्वतः आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. सांस्कृतिक मंडळ’ या संस्थेतील कथित ४ कोटी ८५ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी आरोपी लोकेश उर्फ चेतन कोल्हे याचा अटकपूर्व जामीन जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

 

या प्रकरणात संस्थेत कार्यरत असलेल्या लोकेश उर्फ चेतन कोल्हे याने संगणकीय नोंदींमध्ये फेरफार करून संस्थेचा सुमारे ४ कोटी ८५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. याबाबत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी स्वतः आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, संस्थेच्या वतीने ॲड. एस. आर. भादलीकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समितीची नियुक्ती करण्यात आली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील (लागू तरतुदींनुसार) विश्वासघात, फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्यासंदर्भातील कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी चेतन कोल्हे याने अटकपूर्व जामिनासाठी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणीत फिर्यादीतर्फे ॲड. निशांत अत्रे यांनी, तर सरकार पक्षातर्फे ॲड. सुनील चोरडिया यांनी युक्तिवाद केला. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.

गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, अपहाराची मोठी रक्कम तसेच तपासाच्या दृष्टीने आवश्यक बाबी विचारात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. खोंगल यांनी १६ जुलै २०२६ रोजी आरोपी चेतन कोल्हे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.या निर्णयानंतर संबंधित आरोपीविरुद्ध कायद्यानुसार पुढील अटक व तपासाची कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अटकपूर्व जामीनअपहार प्रकरणगुलाबराव देवकरचेतन कोल्हेलोकेश कोल्हेश्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ
Previous Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन २री निवड चाचणी स्पर्धा

Next Post

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif