• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव जिल्हा बॅडमिंटन २री निवड चाचणी स्पर्धा

३१ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान जे.जे.के.एस. इनडोअर हॉलमध्ये स्पर्धा; प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम मुदत २६ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 18, 2026
in जळगाव, Uncategorized, क्रीडा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन (JDBA) आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी २री निवड चाचणीचे आयोजन ३१ जुलै ते २ऑगस्ट २०२६ यादरम्यान करण्यात येईल. ही स्पर्धा नवी पेठ येथील जे.जे.के.एस.च्या इनडोअर बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी यांनी केले आहे. स्पर्धेत ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील गटांसह खुला व ३५ वर्षांवरील वरिष्ठ गटांचा समावेश करण्यात आला आहे. मुलं व मुली तसेच पुरुष व महिला या गटांमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूस नोंदणी करावी लागणार आहे. प्रवेश अर्ज https://forms.gle/ziPsGAxXdyw2cFeH9 या गुगल फॉर्मद्वारे स्वीकारले जातील. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेतील प्रवेश फक्त जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील सामने जागतिक बॅडमिंटन महासंघ आणि भारतीय बॅडमिंटन संघटना यांच्या नियमांनुसार खेळविण्यात येणार आहेत. सामने सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होतील. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किशोर सिंह ९९७०४ १४९५४ किंवा ९४२११ २११०६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: क्रीडाजळगावजळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनजिल्हास्तरीय स्पर्धाजैन स्पोर्ट्स अकॅडमीबॅडमिंटन
Previous Post

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

Next Post

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या संस्थेतील ४.८५ कोटींच्या अपहारप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या संस्थेतील ४.८५ कोटींच्या अपहारप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या संस्थेतील ४.८५ कोटींच्या अपहारप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif