• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

सामाजिक सलोखा, गोसेवा आणि पर्यावरण संवर्धनातील दीर्घकालीन कार्याची दखल; “सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स” देऊन करण्यात आला सन्मान

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 19, 2026
in जळगाव, सामाजिक
स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : सामाजिक सलोखा, गोसेवा आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात दीर्घकाळ सातत्याने कार्यरत असलेल्या ॲड. विजय सुरजमलजी काबरा (जळगाव, महाराष्ट्र) यांना स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे “सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याबाबत काबरा यांनी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली असता या कामाबाबत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

काबरा हे २००९ पासून अखंडपणे सुरू असलेल्या “सामूहिक गोसेवा – एक अनुष्ठान” या अभियानाद्वारे विविध धर्म, समाजघटक, व्यावसायिक व सामाजिक संस्थांना एकत्र आणून गोसेवा, पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि सामाजिक ऐक्याला चालना देत आहेत. त्यांच्या कार्याला अधोरेखित करून त्यांचा गौरव करण्यात आला. ॲड. काबरा यांनी उपक्रमातून हजारो नागरिकांना गोसेवा व पर्यावरण संवर्धनाशी जोडले आहे. रमजान, मोहरमसारख्या प्रसंगी विविध समाजघटकांचा सहभाग निश्चित करणे, तृतीयपंथीय समाजाला अभियानाशी जोडणे, आकाशवाणी तसेच शाळा-महाविद्यालयांद्वारे जनजागृती करणे हे काम ते करतात. सन १९९४ पासून नोंदणीकृत “पृथ्वी बचाव संस्था”च्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने कार्य करणे, या त्यांच्या उल्लेखनीय कार्यांचा समावेश आहे. स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांच्या या कार्याला “जगातील सर्वात दीर्घकाळ सातत्याने चालणारी बहु-समुदायिक सामूहिक गोसेवा आणि पर्यावरण जनजागृती मोहीम” म्हणून प्रेरणादायी उपलब्धी मानत गौरव केला आहे.

बातमी शेअर करा !
Tags: ॲड. विजय काबरागोसेवाजळगावपर्यावरणसंवर्धनसामाजिक सलोखास्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्स
Previous Post

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन २री निवड चाचणी स्पर्धा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन २री निवड चाचणी स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif