• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शिबिरांना भेट; प्रतापराव पाटील यांचे १६ जुलैच्या विशेष शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 17, 2026
in जळगाव, राजकारण
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

पाळधी : मतदार यादी विशेष पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाला पाळधी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पाळधी खुर्द व पाळधी बुद्रुक येथे आयोजित विशेष शिबिरांमध्ये दिवसभर मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून आपली एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला वेग आला आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी खुर्द येथील शासकीय विश्रामगृह तसेच पाळधी बुद्रुक येथील श्रीराम मंदिर परिसरातील शिबिरांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रत्येक पात्र मतदाराने एसआयआर प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. लोकशाही बळकट करण्यासाठी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी महत्त्वाची असून, कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, असे आवाहन त्यांनी केले.

या अभियानात युवा नेते प्रतापराव पाटील दिवसभर शिबिरस्थळी उपस्थित राहून संपूर्ण कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवत होते. नागरिकांना आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, अर्ज भरण्यास मदत, कागदपत्रांची पडताळणी तसेच उद्भवणाऱ्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी त्यांनी बीएलओ (Booth Level Officer) आणि बीएलए (Booth Level Agent) यांच्याशी सातत्याने समन्वय साधला.

शिवसेना, युवासेना आणि जीपीएस मित्र परिवार यांच्या माध्यमातून या विशेष शिबिरांचे नियोजन करण्यात आले होते. पाळधी बुद्रुक येथील श्रीराम मंदिर आणि पाळधी खुर्द येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळपासून सायंकाळपर्यंत नागरिकांची मोठी गर्दी होती. कार्यकर्त्यांनी अर्ज भरण्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना मदत केली. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्रपणे सहकार्याची व्यवस्था करण्यात आल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या मोहिमेत आतापर्यंत पाळधी परिसरातील सुमारे ४० ते ५० टक्के एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली असून, २५ जुलैपर्यंत शंभर टक्के प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी शिवसेना, युवासेना आणि जीपीएस मित्र परिवाराचे कार्यकर्ते पुढील काही दिवस घराघरांत जाऊन जनजागृती करणार आहेत. एकही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रतापराव पाटील म्हणाले, “एसआयआर प्रक्रिया ही प्रत्येक मतदारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण या प्रक्रियेला प्राधान्य दिले नाही, तर भविष्यात मतदानाचा घटनात्मक हक्क गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आवश्यक कागदपत्रांसह ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा.”

ते पुढे म्हणाले, “पाळधी परिसरात आतापर्यंत ४० ते ५० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली असून, २५ जुलैपूर्वी शंभर टक्के एसआयआर पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते घराघरांत जाऊन जनजागृती करत आहेत. प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याचा आमचा निर्धार आहे.”

ज्या नागरिकांची एसआयआर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांच्यासाठी गुरुवार, दि. १६ जुलै रोजी पुन्हा विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आपली एसआयआर प्रक्रिया पूर्ण करावी आणि आपला मतदानाचा घटनात्मक हक्क सुरक्षित ठेवावा, असे आवाहन प्रतापराव पाटील यांनी केले.

प्रसंगी धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, धरणगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, पाळधी बुद्रुकचे माजी सरपंच संजूभैया देशमुख, उद्योजक अनिलभैया कासट, उपसरपंच निसार देशमुख यांच्यासह शिवसेना, युवासेना, जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, बीएलओ, बीएलए आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कार्यकर्त्यांचे सुयोग्य नियोजन आणि प्रशासनाशी प्रभावी समन्वय यामुळे पाळधी परिसरातील एसआयआर अभियानाला गती मिळाली असून, प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्याच्या दिशेने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: ५ कोटी निधीआमदार सुरेश दामु भोळेएलईडी पथदिवेएलईडी स्ट्रीट लाईटजळगावराजूमामा
Previous Post

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

Next Post

अजिंठा चौफुली ते विमानतळ मार्गावरील एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अजिंठा चौफुली ते विमानतळ मार्गावरील एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी!

अजिंठा चौफुली ते विमानतळ मार्गावरील एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif