• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अजिंठा चौफुली ते विमानतळ मार्गावरील एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी!

आमदार राजू मामा भोळे यांच्या पाठपुराव्याला यश, शहरातील वाहतूक सुरक्षितता, प्रकाश व्यवस्था आणि सौंदर्यात होणार भर

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 17, 2026
in जळगाव, Uncategorized, राजकारण
अजिंठा चौफुली ते विमानतळ मार्गावरील एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील रस्ते अधिक सुरक्षित, सुशोभित आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने आमदार मा. श्री. सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. अपारंपारिक ऊर्जा विकास लेखाशीर्षांतर्गत जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्या सन २०२६-२७ च्या आर्थिक वर्षातील नियोजनातून जळगाव शहरातील अजिंठा चौफुली ते विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर आधुनिक एलईडी पथदिव्यांच्या उभारणीसाठी ५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

या निधीमुळे अजिंठा चौफुली ते विमानतळ मार्गावर अत्याधुनिक एलईडी पथदिव्यांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रकाश व्यवस्था अधिक सक्षम होऊन वाहनचालक, पादचारी, नागरिक तसेच विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे. याशिवाय शहराच्या सौंदर्यातही लक्षणीय वाढ होणार असून हा मार्ग अधिक आकर्षक आणि सुरक्षित बनेल.

या महत्त्वपूर्ण कामासाठी आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. या प्रस्तावास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील . मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे निधी मंजुरीची प्रक्रिया गतीने पूर्ण होऊ शकली.

यावेळी आमदार राजूमामा यांनी या विकासकामासाठी सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, मा. मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन, मंत्री  संजय सावकारे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री  पाटील यांचे  आभार व्यक्त केले.

याबाबत आमदार सुरेश दामु भोळे  म्हणाले, “जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांसाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आगामी काळातही शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे.”

– आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा)

बातमी शेअर करा !
Tags: ५ कोटी निधीआमदार सुरेश दामु भोळेएलईडी पथदिवेजळगावराजूमामास्ट्रीट लाईट
Previous Post

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती

Next Post

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif