• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावच्या महापौरांची ४८५ किमी सायकल वारी पूर्ण!

जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या ७५ सदस्यांनी तीन दिवसांत गाठले पंढरपूर; मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 11, 2026
in जळगाव, विशेष बातमी
जळगावच्या महापौरांची ४८५ किमी सायकल वारी पूर्ण!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

योगेश सुने थेट पंढरपूर वरून

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव/पंढरपूर : जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली वार्षिक पंढरपूर सायकल वारी यंदाही अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक आणि महापौर दीपमाला मनोज काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी या वारीमध्ये सहभाग घेतला आणि जळगाव ते पंढरपूर दरम्यानचे तब्बल ४८५ किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पार केले.

७५ जणांची सायकलवारी विठ्ठल चरणी दाखल; जल्लोषात सांगता

गुरुवार, दिनांक ९ जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजता जळगावच्या आकाशवाणी चौकातून या वारीने प्रस्थान केले होते. राष्ट्रगीत आणि महिला भगिनींनी केलेल्या औक्षणानंतर निघालेला हा ग्रुप शनिवार, दिनांक ११ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी पंढरपूर येथे पोहोचला. पंढरपुरात दाखल होताच सर्व सायकलिस्ट सदस्यांनी आपल्या सायकली हवेत उंचावून वारी पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला.

या सायकल वारीमध्ये महापौर दीपमाला काळे यांच्यासह ६० पुरुष आणि ८ महिला अशा ६८ मुख्य सदस्यांसह एकूण ७५ जणांनी हा ४८५ किलोमीटरचा खडतर प्रवास तीन दिवसांत पूर्ण केला.

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन

सायकलवारी पंढरपुरात सुखरूप आणि यशस्वीरीत्या पूर्ण होताच, जळगाव जिल्ह्याचे नेते तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी थेट दूरध्वनीवरून व्हिडिओ कॉलद्वारे महापौर दीपमाला काळे आणि सर्व सायकलिस्ट सदस्यांशी संवाद साधला. वारी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सुदृढ आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या वारीच्या यशस्वी पूर्ततेनंतर महापौर दीपमाला काळे यांनी जळगावकरांचे आभार मानले. “माऊलींच्या चरणी सायकल वारी करण्याचे हे माझे सलग दुसरे वर्ष आहे. ही केवळ धार्मिक वारी नसून, एक सामाजिक आणि आरोग्यविषयक संदेश देणारी चळवळ आहे. सायकल चालवण्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहतेच, शिवाय इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे रक्षण होते, हाच संदेश आम्हाला या वारीतून द्यायचा होता,” असे महापौर दीपमाला काळे म्हणाल्या.

विठ्ठलाला साकडे:

“गेल्या १५३ दिवसांत जळगाव शहराची प्रथम नागरिक म्हणून काम करताना मी ‘आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण’ या गोष्टींना नेहमीच प्राधान्य दिले आहे. विठ्ठलाच्या चरणी लीन होताना मी संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या समृद्धीसाठी, शेतकरी बांधवांच्या सुखासाठी आणि जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठी साकडे घातले आहे. जळगावला स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी आम्ही जे ‘विकास व्हिजन’ हाती घेतले आहे, त्याला पांडुरंगाने बळ द्यावे हीच प्रार्थना केली,” अशी भावना महापौर काळे यांनी व्यक्त केली.

जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या या यशस्वी उपक्रमाचे आणि विशेषतः महापौरांच्या या जिद्दीचे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून आणि राजकीय स्तरातून मोठे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव_सायकलिस्ट_ग्रुपदीपमाला_काळेपंढरपूरमहापौरसायकलवारी
Previous Post

चाळीसगाव येथे वारकर्‍यांसाठी ’डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

Next Post

एमडी ड्रग्ज रॅकेटचा फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
एमडी ड्रग्ज रॅकेटचा फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना!

एमडी ड्रग्ज रॅकेटचा फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif