• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

एमडी ड्रग्ज रॅकेटचा फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना!

दोन आरोपी सात दिवसांच्या पोलीस कोठडीत; ड्रग्ज पुरवठ्याचे संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी तपास वेगात

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 13, 2026
in क्राईम, जळगाव
एमडी ड्रग्ज रॅकेटचा फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्यLive न्यूज नेटवर्क 

जळगाव | प्रतिनिधी : जळगावात उघडकीस आलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयित भैय्या सोनवणे याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तीन विशेष पथके रवाना केली आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची सध्या पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणामागील संपूर्ण ड्रग्ज रॅकेट उघड करण्याच्या दृष्टीने तपासाला वेग आला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवतीर्थ मैदान प्रवेशद्वाराजवळ, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसरात स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हापेठ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जयेश देविदास तायडे (२७, हरीओम नगर) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (३१, कांचन नगर) या दोघांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून ५६.२९ ग्रॅम एमडी ड्रग्ज तसेच एक दुचाकी जप्त करण्यात आली होती.

चौकशीदरम्यान अटक आरोपींनी हा अंमली पदार्थ भैय्या सोनवणे याच्याकडून मिळाल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी फरार आरोपीच्या शोधासाठी तीन स्वतंत्र पथके विविध ठिकाणी रवाना केली असून, त्याच्या हालचालींचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात ड्रग्जचा पुरवठा, आर्थिक व्यवहार, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

या कारवाईमुळे जळगावातील ड्रग्ज तस्करीविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाली असून, फरार आरोपीला लवकरच अटक होईल, असा विश्वास तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा !
Tags: एमडी ड्रग्सएलसीबीफरार आरोपीभैय्या सोनवणेस्थागुशा
Previous Post

जळगावच्या महापौरांची ४८५ किमी सायकल वारी पूर्ण!

Next Post

राजकीय फिटनेस जपत… विकासाची सायकल जळगावच्या कानाकोपऱ्यात!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
राजकीय फिटनेस जपत… विकासाची सायकल जळगावच्या कानाकोपऱ्यात!

राजकीय फिटनेस जपत... विकासाची सायकल जळगावच्या कानाकोपऱ्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif