• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

चाळीसगाव येथे वारकर्‍यांसाठी ’डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

तीन दिंड्यांतील शेकडो वारकर्‍यांना सेवाभावातून आरोग्याचा उपहार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 11, 2026
in जळगाव, Uncategorized
चाळीसगाव येथे वारकर्‍यांसाठी ’डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात विठ्ठलनामाचा अखंड गजर करत पायी प्रवास करणार्‍या वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेत गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव यांच्या वतीने चाळीसगाव येथे मोफत फिजिओथेरपी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. सेवाभाव, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट प्रत्यय देणार्‍या या उपक्रमात तीन प्रमुख दिंड्यांमधील शेकडो वारकर्‍यांना मोफत आरोग्यसेवा प्रदान करण्यात आली.

दरवर्षी हजारो वारकरी अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात. या दीर्घ प्रवासामुळे मान, पाठ, कंबर, गुडघे, पाय आणि सांध्यांमध्ये वेदना, स्नायूंचा ताण तसेच शारीरिक थकवा जाणवणे ही सामान्य बाब असते. हीच गरज ओळखून महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने वारकर्‍यांसाठी विशेष फिजिओथेरपी सेवा शिबिर आयोजित केले.शिबिरात वारकर्‍यांच्या शारीरिक तक्रारींचे सखोल मूल्यमापन करून आवश्यक त्या फिजिओथेरपी उपचारांद्वारे वेदना कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याशिवाय स्नायू व सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी स्ट्रेचिंगचे व्यायाम, ताकद वाढविणारे व्यायाम, योग्य शरीरस्थिती राखण्याचे मार्गदर्शन तसेच पुढील प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी आवश्यक आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. अनेक वारकर्‍यांनी उपचारानंतर वेदना कमी झाल्याची भावना व्यक्त करत डॉक्टरांच्या सेवाभावाचे कौतुक केले.या सेवा शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. मनोज सूर्यवंशी यांनी नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

 

त्यांच्या नेतृत्वाखाली डॉ. उत्कर्ष भोळे, डॉ. सलोनी किर, डॉ. नयन शेटे आणि डॉ. सृष्टी तभाणे यांनी अत्यंत समर्पित भावनेने वारकर्‍यांची सेवा केली. प्रत्येक वारकर्‍याला आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन मिळावे यासाठी डॉक्टरांच्या पथकाने दिवसभर अविरत कार्य केले.

बातमी शेअर करा !
Tags: आषाढी वारीचाळीसगावजळगावपंढरपूर वारीवारकरीविठ्ठल
Previous Post

जळगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई; १० गुन्ह्यांची उकल, ५ अट्टल आरोपी जेरबंद, ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

जळगावच्या महापौरांची ४८५ किमी सायकल वारी पूर्ण!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावच्या महापौरांची ४८५ किमी सायकल वारी पूर्ण!

जळगावच्या महापौरांची ४८५ किमी सायकल वारी पूर्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif