• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धकृती पुतळ्याचा उद्या जळगावात अनावरण सोहळा

माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार अनावरण; हर्षवर्धन सपकाळ अध्यक्षस्थानी, अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 7, 2026
in जळगाव, Uncategorized, सामाजिक
लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धकृती पुतळ्याचा उद्या जळगावात अनावरण सोहळा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक असलेले बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उद्या, बुधवार दिनांक ८ जुलै २०२६ रोजी त्यांच्या अर्धकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी, जळगाव यांच्या वतीने या सोळाव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनावरण सोहळा जुना खेडी रोडवरील शंकरराव नगर येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या प्रांगणात सकाळी ११:०० वाजता संपन्न होणार आहे.

 

या सोहळ्याचे अनावरण भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ असणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे, माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य आ. एकनाथराव खडसे आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

या सोहळ्याला जळगाव शहराचे आमदार आ. राजूमामा भोळे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आ. सत्यजित पाटील, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जळगाव शहराच्या महापौर सौ. दीपमाला काळे, आणि क.ब.चौ.उ.म.वि. जळगावचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी तसेच माजी कुलगुरू प्रा. एन. के. ठाकरे, प्रा. के. व्ही. पाटील, प्रा. आर. एस. माळी, मा. प्रा. शिवाजीराव पाटील आणि मा. प्रा. पी. पी. पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

कार्यक्रमाचे यजमान तथा धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष शिरीष मधुकरराव चौधरी यांच्यासह संस्थेचे सचिव प्रा. डॉ. पी. आर. चौधरी, उपाध्यक्ष श्री. सुनील पाटील, खजिनदार श्री. निळकंठ काळे, सहसचिव श्री. पुरुषोत्तम पाटील व सर्व संचालक मंडळाने या सोहळ्याला आणि लोकसेवकाच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

 

बातमी शेअर करा !
Tags: अर्धकृती पुतळा अनावरणजळगावधनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीन्यायमूर्ती भूषण गवईबाळासाहेब चौधरीलोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी
Previous Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले .

Next Post

आयआयटी, परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आयआयटी, परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार!

आयआयटी, परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif