• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

‘दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड्स २०२६’मध्ये काजल रूतूराज भोईटे यांना ‘सर्वोत्कृष्ट मॉडेल’ पुरस्कार

मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये रंगलेल्या भव्य सोहळ्यात जळगावच्या कन्येचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘Mrs. Unity World Earth’ किताबानंतर आणखी एक मानाचा सन्मान

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 7, 2026
in जळगाव, गौरव
‘दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड्स २०२६’मध्ये काजल रूतूराज भोईटे यांना ‘सर्वोत्कृष्ट मॉडेल’ पुरस्कार
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

मुंबई. : मुंबईतील प्रसिद्ध सहारा स्टार हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड्स २०२६’ या प्रतिष्ठित सोहळ्यात जळगाव येथील व फलटणच्या सुनबाई सौ. काजल रूतूराज भोईटे यांना ‘सर्वोत्कृष्ट मॉडेल’ (Best Model) या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

मॉडेलिंग क्षेत्रातील सातत्यपूर्ण यश, व्यावसायिकता, मेहनत आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग क्षेत्रात उदयोन्मुख मॉडेल म्हणून त्यांची ओळख अधिक भक्कम झाली आहे. तसेच मॉडेलिंग आणि फॅशन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत.

यापूर्वीही सौ. काजल रूतूराज भोईटे यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत ‘Mrs. Unity World Earth’ हा आंतरराष्ट्रीय किताब पटकावला होता. त्यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.

सौ. काजल रूतूराज भोईटे या जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी सभापती रोहिदास मधुकर पाटील व सौ. ऊज्वला पाटील यांच्या कन्या आहेत. फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात त्यांनी आपल्या कौशल्याच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: काजल रुतुराज भोईटेजळगावदादासाहेब_फाळके_अवॉर्डफॅशन मॉडेलमॉडलिंगराष्ट्रीय गौरव
Previous Post

भाजपाचा कार्यकर्ता हा 365 दिवस कार्य करणारा – आ. सुरेश भोळे

Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले .

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif