• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथिक कॉलेजमध्ये डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या १८३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

हॅनेमिनियन शपथ, मार्गदर्शनपर व्याख्याने आणि होमिओपॅथीच्या तत्त्वांवर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 4, 2026
in जळगाव, आरोग्य
डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथिक कॉलेजमध्ये डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या १८३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन विभागातर्फे होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या १८३ व्या पुण्यतिथीनिमित्त २ जुलै रोजी विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता डॉ. हॅनेमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर डॉ. पंकज शर्मा, डॉ. विपुल त्रिआहार आणि डॉ. सचिन डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले यांनी डॉ. हॅनेमन यांच्या जीवनकार्याचा, तत्त्वज्ञानाचा आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी होमिओपॅथीच्या मूलभूत तत्त्वांशी निष्ठावान राहून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी डॉ. पंकज शर्मा यांनी आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातही डॉ. हॅनेमन यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. विपुल त्रिआहार यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अध्ययन, संशोधनवृत्ती आणि नैतिक वैद्यकीय सेवेची प्रेरणा दिली. तर डॉ. सचिन डी. पाटील यांनी रुग्णांप्रती सहानुभूती, सेवाभाव आणि व्यावसायिक जबाबदारीचे महत्त्व विशद केले.

 

कार्यक्रमात प्रथम वर्ष बीएचएमएसचा विद्यार्थी राहुल गाडगे याने विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करत डॉ. हॅनेमन यांचा वैद्यकीय वारसा जतन आणि वृद्धिंगत करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यानंतर सकाळी ११ वाजता डॉ. प्रतीक डी. पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना ‘हॅनेमिनियन शपथ’ दिली.

 

या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बीएचएमएसच्या सर्व वर्षांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन विभागातर्फे करण्यात आले, तर भूषण वानखेडे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावडॉ_उल्हास_पाटील_होमिओपॅथिक_मेडिकल_कॉलेजडॉ_सॅम्युअल_हॅनेमनबीएचएमएसहॅनेमन_पुण्यतिथीहोमिओपॅथी
Previous Post

नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची इस्रोच्या IIRS डेहराडून कार्यशाळेसाठी निवड

Next Post

अमळनेरच्या वाडीसंस्थान आगीच्या दुर्घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुनर्बांधणीचे आदेश!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अमळनेरच्या वाडीसंस्थान आगीच्या दुर्घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुनर्बांधणीचे आदेश!

अमळनेरच्या वाडीसंस्थान आगीच्या दुर्घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुनर्बांधणीचे आदेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात शिवकाळाचा जिवंत थरार! ‘जगदंब’च्या हुंकाराने सह्याद्री जणू कान्हदेशात अवतरला* महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026
नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

October 18, 2026
श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 16, 2026
जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

October 15, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

October 15, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif