• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची इस्रोच्या IIRS डेहराडून कार्यशाळेसाठी निवड

START कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी; टी.वाय.बी.एस्सी.चा विद्यार्थी प्रतीक अरुण निकुम यांना 26 जुलैच्या राष्ट्रीय कार्यशाळेसाठी निमंत्रण

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 5, 2026
in जळगाव, Uncategorized, शैक्षणिक
नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची इस्रोच्या IIRS डेहराडून कार्यशाळेसाठी निवड
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

नूतन मराठा महाविद्यालयाला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या START (Space Science and Technology Awareness Training) कार्यक्रमासाठी केंद्र म्हणून मान्यता मिळाली होती. या कार्यक्रमात महाविद्यालयातील एकूण 25 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 15 विद्यार्थ्यांनी ‘A’ ग्रेड मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशस्वी विद्यार्थ्यांमधून टी.वाय.बी.एस्सी.चा विद्यार्थी प्रतीक अरुण निकुम याची ISRO अंतर्गत Indian Institute of Remote Sensing (IIRS), डेहराडून येथे आयोजित विशेष कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. ही कार्यशाळा 26 जुलै रोजी आयोजित करण्यात आली असून त्यासाठी प्रतीक निकुम यांना अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे.

या कार्यशाळेसाठी जाण्या-येण्याचा थ्री-टियर एसी रेल्वे प्रवास तसेच निवासाचा संपूर्ण खर्च Indian Institute of Remote Sensing (IIRS), डेहराडून यांच्याकडून करण्यात येणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल नूतन मराठा महाविद्यालयात प्रतीक अरुण निकुम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील तसेच सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष व भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. बी. देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतीक निकुम यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून इतर विद्यार्थ्यांसाठीही ही प्रेरणादायी बाब ठरली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: आयआयआरएस_डेहराडूनइस्रोनूतन_मराठा_महाविद्यालयप्रतीक_अरुण_निकुमविद्यार्थी_यशस्टार्ट_कार्यक्रम
Previous Post

जामनेरमध्ये घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी ताब्यात, ६.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथिक कॉलेजमध्ये डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या १८३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथिक कॉलेजमध्ये डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या १८३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथिक कॉलेजमध्ये डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या १८३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif