• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मेहरूण विभागीय क्रीडा संकुलासाठी प्रशस्त रस्त्याचा मार्ग मोकळा; २५० कोटींच्या प्रकल्पाची अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी!

जळगाव शहरातील मेहरूण सर्व्हे क्र. ३४३ येथे उभारल्या जात असलेल्या विभागीय क्रीडा संकुलासाठी विद्यमान रस्ता उपलब्ध करून देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश; कार्यवाहीला प्राधान्य

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 3, 2026
in जळगाव, क्रीडा
मेहरूण विभागीय क्रीडा संकुलासाठी प्रशस्त रस्त्याचा मार्ग मोकळा; २५० कोटींच्या प्रकल्पाची अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :  शहरासाठी २५० कोटी रुपये खर्चून मेहरूण सर्व्हे क्रमांक ३४३ येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य विभागीय क्रीडा संकुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहराला आधुनिक आणि दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध होणार असून, संकुलाकडे जाणारा रस्ता देखील प्रशस्त आणि सुलभ असणे आवश्यक असल्याने त्या दृष्टीने गुरुवारी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करण्यात आली.

सध्या विभागीय क्रीडा संकुलाकडे जाण्यासाठी वापरला जाणारा रस्ता कच्चा आणि वहिवटीचा असल्याने भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन त्याचे नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

या पाहणीवेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम (भा. प्र. से.), महापौर दिपमाला काळे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, प्रांताधिकारी विनय गोसावी, महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले, नगररचना विभागाचे अमोल पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान सध्या प्रत्यक्ष वापरात असलेलाच विद्यमान रस्ता विभागीय क्रीडा संकुलासाठी अधिकृतपणे उपलब्ध करून देण्याबाबत जळगाव महानगरपालिका आयुक्त, सहाय्यक संचालक (नगररचना) तसेच उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. या निर्णयानुसार आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने आणि प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

विभागीय क्रीडा संकुलाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जळगाव शहरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून, शहराच्या विकासात हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

बातमी शेअर करा !
Tags: २५० कोटी प्रकल्पगिरीष महाजनजळगावजळगाव विकासमेहरूणविभागीय क्रीडा संकुल
Previous Post

‘जळगावच्या जनतेला न्याय द्या’; विधानसभेत राजूमामांची सरकारकडे जोरदार मागणी!

Next Post

जामनेरमध्ये घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी ताब्यात, ६.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जामनेरमध्ये घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी ताब्यात, ६.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जामनेरमध्ये घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी ताब्यात, ६.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif