• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

तीव्र पोटदुखी, पोट फुगणे व शौचास अडथळा; वेळीच निदानामुळे यशस्वी शस्त्रक्रिया

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 26, 2026
in जळगाव, आरोग्य
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : तीव्र पोटदुखी, पोट फुगणे आणि अनेक दिवस शौचास न होणे अशा गंभीर त्रासामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या ७८ वर्षीय वृद्धाचे प्राण शल्यचिकित्सकांच्या तत्परतेमुळे वाचले. मोठ्या आतड्याला बसलेला धोकादायक पीळ (सिग्मॉइड व्हाल्वुलस) याचे अचूक निदान करून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने रुग्णाला नवजीवन मिळाले.

याबाबत माहिती अशी की, मलकापूर येथील लक्ष्मण पाटील या ७८ वर्षीय रुग्णाला काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. कालांतराने त्यांचे पोट मोठ्या प्रमाणात फुगले आणि शौचास होणे पूर्णपणे बंद झाले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी शल्यचिकीत्सक डॉ. चैतन्य पाटील यांनी रुग्णाच्या लक्षणांचा सखोल अभ्यास करून तातडीने सीटी स्कॅन करण्यात आला. या तपासणीत मोठ्या आतड्याच्या सिग्मॉइड भागाला पीळ बसल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय भाषेत या स्थितीला सिग्मॉइड व्हाल्वुलस असे म्हटले जाते.सिग्मॉइड व्हाल्वुलसमध्ये आतडे स्वतःभोवती वळल्याने अन्न, वायू आणि मल यांचा मार्ग पूर्णपणे बंद होतो. उपचारास विलंब झाल्यास आतड्याचा रक्तपुरवठा थांबून आतडे निकामी होण्याचा तसेच जीवाला धोका निर्माण होण्याचा संभव असतो. त्यामुळे निदान होताच शल्यचिकित्सक डॉ. चैतन्य पाटील यांच्यासह डॉ. प्रज्योत कदम, डॉ. आदीत्य पाटील यांच्या टीमने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.शस्त्रक्रियेदरम्यान आतड्याला बसलेला पीळ यशस्वीरित्या सोडविण्यात आला. तसेच आतड्याची स्थिती तपासून आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारू लागली असून सध्या ते धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

कोट…

सिग्मॉइड व्हाल्वुलस ही विशेषतः वृद्धांमध्ये आढळणारी गंभीर समस्या आहे. पोटदुखी, पोट फुगणे, उलट्या होणे किंवा शौचास न होणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये. वेळेत सीटी स्कॅनसारख्या तपासण्या केल्यास अचूक निदान होते आणि योग्य उपचारांमुळे जीवितहानी टाळता येते. या रुग्णाच्या बाबतीतही वेळीच निदान झाल्यामुळे शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले.

– डॉ. प्रज्योत कदम, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

बातमी शेअर करा !
Tags: आतड्याला पीळडॉ. चैतन्य पाटीलपोटदुखीशस्त्रक्रियासिग्मॉइड व्हाल्वुलससीटी स्कॅन
Previous Post

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी!

Next Post

सहा बंडखोर खासदार यांच्या निषेधार्थ आंदोलन…!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

सहा बंडखोर खासदार यांच्या निषेधार्थ आंदोलन...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif