• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी!

गोदावरीचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अदनान अलींच्या सेवेची दमदार यशस्वी सूरूवात,

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 27, 2026
in जळगाव, आरोग्य
एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : नूकतेच रूजू झालेले हृदयविकार तज्ञ डॉ. अदनान अलीांच्या सेवेची दमदार यशस्वी सूरूवात झाली असून विविध कारणांमुळे त्रस्त असलेल्या चार रुग्णांवर एकाच दिवशी यशस्वी एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या हृदयालयाने आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अनुभवी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली व त्यांच्या तज्ज्ञ टीमच्या प्रयत्नांमुळे चारही रुग्णांना नवजीवन मिळाले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर व समाधानकारक आहे.

 

हृदयविकाराशी संबंधित विविध तक्रारी घेऊन चार रुग्ण उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल झाले होते. काही रुग्णांना छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास, चालताना दम लागणे आणि हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणे जाणवत होती. रुग्णांच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तातडीने हृदयालयात दाखल करण्यात आले. हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अदनान अली यांनी रुग्णांची सखोल तपासणी केली. त्यानंतर एन्जिओग्राफीसह आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमधून चारही रुग्णांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्या कोरोनरी धमन्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अडथळे असल्याचे निदर्शनास आले. या अडथळ्यांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढला होता.रुग्णांची स्थिती आणि तपासणी अहवालांचा अभ्यास केल्यानंतर तातडीने एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. हृदयालयातील अत्याधुनिक कॅथलॅब सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांच्या समन्वयातून चारही रुग्णांवर यशस्वी एन्जिओप्लास्टी करण्यात आली.

उपचारांना प्रतिसाद

या प्रक्रियेदरम्यान बंद झालेल्या किंवा अरुंद झालेल्या धमन्यांमध्ये स्टेंट बसवून रक्तपुरवठा सुरळीत करण्यात आला.शस्त्रक्रियेनंतर चारही रुग्णांना अतिदक्षता विभागात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ल्यासह पुढील उपचार देण्यात येत आहेत.

 

अत्याधुनिक सुविधा, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि वेळेवर उपलब्ध होणारे उपचार यामुळे परिसरातील हृदयरुग्णांसाठी हे हृदयालय आशेचा किरण ठरत आहे. हृदयविकाराची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा थकवा जाणवणे याकडे दुर्लक्ष केले जाते. वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास गंभीर धोके टाळता येतात.

-डॉ. अदनान अली, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

बातमी शेअर करा !
Tags: एन्जिओप्लास्टीगोदावरी हृदयालयजळगावडॉ. अदनान अलीडॉ. उल्हास पाटील रुग्णालयहृदयविकार
Previous Post

खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!

Next Post

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif