• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेची जाहीर माफीची मागणी; प्रशासनाला दिले निवेदन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 26, 2026
in जळगाव, आंदोलन
खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव (प्रतिनिधी) – लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी आहे. असे असतानाही खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेली आक्षेपार्ह व अवमानकारक भाषा अत्यंत निषेधार्ह आहे, अशी तीव्र भूमिका ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेने’ घेतली आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने जळगावात प्रशासनाला निवेदन देऊन खासदारांवर कठोर कारवाईची आणि त्यांच्या जाहीर माफीची मागणी करण्यात आली आहे.

 

२५ जून रोजी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांविषयी अत्यंत अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचे समोर आले आहे. लोकप्रतिनिधीच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण पत्रकार बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, यामुळे पत्रकारांचा अपमान झाला आहे. हे कृत्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारांचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांना थेट बाधा पोहोचवणारे असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

 

पत्रकार सुरक्षा आणि सन्मानाचा प्रश्न

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, पत्रकार हे समाज आणि प्रशासन यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनतेचे प्रश्न, समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकार प्रामाणिकपणे करत असतात. अशा संवेदनशील परिस्थितीत जबाबदार लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांबाबत अपमानास्पद भाषा वापरली जाणे हे अत्यंत दुर्दैवी, खेदजनक आणि लोकशाहीला काळिमा फासणारे आहे.

 

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना, जळगाव जिल्ह्याच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा. संबंधित खासदारांवर कायदेशीर व योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात यावी अशी आग्रही मागणी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेकडून करण्यात आली. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक सचिव भगवान सोनार, संस्थापक खजिनदार ललित खरे, जळगाव जिल्हा अध्यक्ष चेतन वाणी, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जळगाव शहर अध्यक्ष जितेंद्र कोतवाल, पत्रकार मनिष जोग,नरेंद्र पाटील, किशोर पाटील,योगेश सुने,पवन खंबायत, योगेश चौधरी, धर्मेंद्र राजपूत, संदीप वानखेडे, निखिल वाणी विकास पात्रे, नाजनिन शेख, कल्पेश हिरवळकर, जगमोहसिंग ठाकुर, यांच्या सह  जळगाव जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ व तरुण पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी शेअर करा !
Tags: अवच्य शिवीगाळआंदोलनखासदार संजय पाटीलजळगावनिषेधपत्रकार
Previous Post

वरुणराजा धावला शेतकऱ्यांच्या मदतीला !

Next Post

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी!

एकाच दिवशी चार रुग्णांवर एन्जिओप्लास्टी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif