• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग; योगाचे महत्त्व पटवून देत आरोग्यदायी जीवनाचा संदेश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 23, 2026
in जळगाव, आरोग्य
एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

वावडदा — एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री साळुंखे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध मांडणीने झाली. शाळेतील विद्यार्थ्यांना रिफॉर्मर, परफॉर्मर, ग्लेडिएटर आणि वॉरियर्स अशा चार गटांमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक गटाला अनुक्रमे लाल, हिरवा, पिवळा आणि निळा रंगाचा गणवेश देण्यात आला होता, ज्यामुळे संपूर्ण परिसर आकर्षक दिसत होता.

शाळेचे शिक्षक श्री. किशोर शिरसाट आणि शिक्षिका सौ. आशा बागुल यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सुधारते, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर क्रीडा शिक्षक श्री. दिलीप चौधरी, शिक्षिका सौ. दीपिका नंदवलकर आणि संगीत शिक्षक श्री. कुशराजे पवार यांनी “राम आएंगे” या गीतावर सुंदर कवायत सादर केली. पुढे शिक्षिका श्रीमती प्राजक्ता पाटील यांनी योगाचे प्रात्यक्षिक समजावून सांगितले, तर क्रीडा शिक्षकांनी ते सादर करून दाखवले.

कार्यक्रमात इयत्ता 1 ली ते 10 वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहाने योगाभ्यास केला आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे धडे घेतले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. जयश्री साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेच्या कॉर्डिनेटर अन्वेषा माहेश्वरी, प्राजक्ता पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय योगदिन शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्य जागरूकतायोग दिवसवावडदा बातम्याविद्यार्थी सहभागशालेय उपक्रमस्कूल इव्हेंट
Previous Post

पाथरीत अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार!

Next Post

विद्यार्थ्यांनो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आधी दिशा ठरवा – खा. स्मिता वाघ

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
विद्यार्थ्यांनो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आधी दिशा ठरवा – खा. स्मिता वाघ

विद्यार्थ्यांनो जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आधी दिशा ठरवा - खा. स्मिता वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif