• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

पाथरीत अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार!

एमआयडीसी पोलिसांनी नराधम आरोपीला ठोकल्या बेड्या

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 21, 2026
in क्राईम
पाथरीत अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगांव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाथरी येथेएका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून, तिला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २:००

 

वाजेच्या सुमारास पाथरी गावातील एका भागात घडली. पीडित मुलगी घरात एकटीच असताना, गावातीलच ३५ वर्षीय आरोपी दीपक प्रकाश निकम याने घराच्या मागच्या दाराने आत प्रवेश केला. मुलगी स्वयंपाकघरात (किचन) काम करत असताना, आरोपीने तिला गाठून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिचा हात पकडून बळजबरीने बेडरूममध्ये नेऊन तिच्या संमतीशिवाय अत्याचार केला. यानंतरही आरोपीने पुन्हा एकदा तिच्यासोबत असाच संतापजनक प्रकार केला.

 

या छळाला कंटाळून अखेर पीडितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. २१ जून २०२६ रोजी प्राप्त झालेल्या या फिर्यादीवरून आरोपी दीपक प्रकाश निकम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ६४(२) (M), ६Current, ३५१ (२) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा कलम ४(२), ५(L) आणि ६ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

 

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम आरोपी दीपक निकम याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील करत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: एमआयडीसी पोलीसकारवाईक्राईमगुन्हाजळगाव तालुकापाथरीपोलीस
Previous Post

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

Next Post

एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा!

एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif