• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

AI मॉर्फ असलेला मंत्री गिरीश महाजनांचा फोटो प्रकरणी बदनामीचा गुन्हा दाखल!

नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दिली तक्रार,सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो प्रसारित केल्याप्रकरणी कारवाई; तर फोटो एआय मार्क केला असल्याचा मंत्री महाजनांचा दावा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 20, 2026
in जळगाव, सायबर क्राईम
AI मॉर्फ असलेला मंत्री गिरीश महाजनांचा फोटो प्रकरणी बदनामीचा गुन्हा दाखल!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव: राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मॉर्फ करण्यात आलेले कथित बनावट फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा क्रमांक 17/2026 नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 356, 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(C) आणि 67 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फेसबुक खात्यावरून मंत्री गिरीश महाजन यांचे AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेले अथवा मॉर्फ केलेले फोटो वापरून आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला होता.

याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला.

दरम्यान, गिरीश महाजन यांनीही माध्यमांशी बोलताना संबंधित फोटो मॉर्फ केलेले असल्याचा दावा केला आहे.

काही फोटो क्रॉप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संबंधित सोशल मीडिया अकाउंटधारक आणि फोटो प्रसारित करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जळगाव सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील अप्रमाणित, दिशाभूल करणाऱ्या अथवा संशयास्पद पोस्टवर विश्वास ठेवू नये.

तसेच अशा पोस्ट पुढे शेअर किंवा प्रसारित करणे टाळावे, अन्यथा संबंधित व्यक्तींनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. लागू शकते

बातमी शेअर करा !
Tags: AI मॉर्फ फोटोगिरीश महाजनजळगाव सायबर पोलीसफेसबुक प्रकरणसायबर क्राईमसोशल मीडिया पोस्ट
Previous Post

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम

Next Post

विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

विकसित भारत रोजगार योजना' अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif