• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब!

अतिक्रमण, पार्किंग आणि अपूर्ण खड्ड्यांच्या कामांवरून बैठकीत तीव्र नाराजी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 16, 2026
in जळगाव, महापालिका
रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव –  शहर महानगरपालिकेतील अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित राहिल्याच्या पार्श्वभूमीवर, महापौर दीपमाला काळे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची एक तातडीची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत शहरातील विविध समस्यांवरून महापौरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विशेषतः रिंग रोडची दुरवस्था, अतिक्रमण विषयावरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

रिंग रोडच्या कामावरून सार्वजनिक बांधकाम विभागावर कडक कारवाईचे संकेत

रिंग रोडवरील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत महापौरांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी (पीडब्ल्यूडी) या विषयाकडे गंभीरतेने पाहत नाहीत. बैठकीला बोलावले तरी ते येत नाहीत आणि फोनवर केवळ उडवाउडवीची उत्तरे देतात. रिंग रोडवर झालेल्या अनेक अपघातांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, तेथील नगरसेवकांना जनतेला उत्तरे देणे कठीण झाले आहे,” अशा शब्दांत महापौरांनी संताप व्यक्त करत, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक भूमिका घेण्याचे निर्देश दिले.

अतिक्रमणावर वचक का नाही? पार्किंग लॉट उभारण्याच्या सूचना

शहरातील अतिक्रमणाचा आढावा घेताना महापौर म्हणाल्या, “एकदा अतिक्रमण उचलले की ते पुन्हा का होते? अतिक्रमणधारकांवर प्रशासनाचा वचक का नाही?” फेरीवाल्यांना पट्ट्या आखून देऊन किंवा पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करण्याच्या कामात दिरंगाई का होत आहे, असा जाब त्यांनी विचारला. जळगावचे रस्ते मोकळे झालेच पाहिजेत, असे सांगतानाच शहरात झोनवाईज ‘पार्किंग लॉट’ उभारता येतील का, याची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच अतिक्रमण विभागातील अपुऱ्या मनुष्यबळासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

कामचुकार जुन्या ठेकेदारांना डच्चू द्या!

“महापालिकेची कामे जे प्रामाणिकपणे आणि वेळेत पूर्ण करतील, त्यांनाच यापुढे कामे द्या. कामे रेंगाळत ठेवणाऱ्या जुन्या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करा आणि नवीन ठेकेदारांना संधी द्या,” असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. यासोबतच शहरातील बेशिस्त रिक्षांना शिस्त लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

उत्पन्न वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन जागांचा शोध

मनपाच्या शहरातील पडीत असलेल्या जागा विकसित करून महापालिकेचा महसूल कसा वाढवता येईल, याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.

साने गुरुजी ग्रंथालय: ग्रंथालयाजवळ सुरू असलेल्या बांधकामाची माहिती दिली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या जागेचा विद्यार्थ्यांसाठी कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल, याची माहिती घेण्यास सांगितले.

चौक सुशोभीकरण व खड्डे: शहरातील खड्ड्यांची डागडुजी अद्याप अपूर्ण असल्याबद्दल आणि चौक सुशोभीकरणाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या विकासकांची माहिती गोळा करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, पंकज गोसावी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राजू लाकूडझोडे, शहर अभियंता योगेश बोरोले, नगर रचना विभागाचे अमोल पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव बातम्यामनपामहानगरपालिकामहापौर दीपमाला काळेरिंगरोड
Previous Post

महायुतीच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

Next Post

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार!

तापी-पूर्णा खोऱ्यातील 'अभ्यासू नेतृत्व' विधानपरिषदेत पोहोचणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावमध्ये QR कोड कचरा व्यवस्थापनातील त्रुटींवर उपमहापौर मनोज चौधरी यांचा सवाल

June 19, 2026

जळगावातील बिस्मिल्ला चौकात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात

June 19, 2026

जैन हिल्स येथे“फ्रूटफुल इंडिया” प्रकल्पाची राष्ट्रीय

June 19, 2026
महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

महाजनांनी घेतले ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 18, 2026

जळगाव विधान परिषद मतदानाला सुरुवात; सकाळी 10:30 वाजेपर्यंत 65 टक्के मतदारांनी बजावला हक्क

June 18, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif