• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महायुतीच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

महायुतीच्या विजयासाठी भाजप नगरसेवक मैदानात; नंदकिशोर महाजन यांना विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 15, 2026
in जळगाव, Uncategorized, राजकारण
महायुतीच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी रणनीती, मतदान प्रक्रिया तसेच निवडणुकीसंदर्भातील विविध बाबींवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पुर्वचे जिल्हाअध्यक्ष चद्रकात बाविस्कर , पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, गटनेते प्रकाश बालाणी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सभागृह नेते नितीन लढ्ढा, विशाल त्रिपाठी यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीची ताकद, राज्यातील विकासकामे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीत मतदान प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या नियमांची माहिती देण्यात आली. मतदान करताना घ्यावयाची काळजी, मत वैध राहण्यासाठी आवश्यक बाबी तसेच निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नगरसेवकांनी विविध प्रश्न उपस्थित करून त्याबाबत माहिती जाणून घेतली.

महायुतीच्या सर्व घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय असून या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीला मिळत असलेला वाढता पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहता ही निवडणूक एकतर्फी होईल, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. एकजूट, पक्षशिस्त आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविली जात असून नंदकिशोर महाजन यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मान्यवरांनी केले.

बैठकीमुळे भाजप नगरसेवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून महायुतीच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव राजकारणजळगाव विधान परिषद निवडणूकनंदकिशोर महाजनभाजपभाजप नगरसेवक बैठकमहायुती
Previous Post

आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Next Post

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब!

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif