• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

जनसेवा हीच राष्ट्रसेवा; विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला आमदार सुरेश भोळे यांचा वाढदिवस

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 14, 2026
in जळगाव, राजकारण
आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव –  शहरातील लोकप्रिय आमदार तथा सर्वसामान्य जनतेच्या मनातील “राजूमामा” म्हणून ओळख असलेले आमदार सुरेश भोळे यांचा वाढदिवस १३ जून रोजी अत्यंत साध्या पण समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त शहरभर विविध सामाजिक, जनहितार्थ आणि लोकहितार्थ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपच्या पाचही मंडळांमध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, अन्नदान, शालेय साहित्य वाटप, कामगार महिलांना साड्यांचे वितरण, तसेच गोशाळांमध्ये गाईंना चारा व लापशी वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

महापौर दीपमाला काळे यांच्या वतीने शाहूनगर येथील गोशाळेत गाईंना चारा वाटप करण्यात आले. मंडळ क्रमांक ३ मध्ये जितेंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने स्वामी समर्थ केंद्र, शारदाश्रम येथे भव्य वृक्षारोपण करण्यात आले. शिवाजीनगर येथे माजी नगरसेवक राजेंद्र मराठे व कार्यकर्त्यांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

 

जुने जळगाव येथे भाजपचे चिटणीस मिलिंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. पांझरा पोळ गोशाळेत गाईंना लापशी व चारा देण्यात आला. जिल्हा महानगराच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजू नागरिकांना अन्नदान तसेच रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

 

मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष अजित राणे यांच्या वतीने संत गाडगेबाबा निराधार केंद्र, भजगल्ली येथे सुमारे ७० महिला व पुरुषांना भोजन देण्यात आले. शासकीय निरीक्षण गृहातील मुलांना नगरसेविका अंकिता पाटील यांच्या वतीने जेवण देण्यात आले, तर भाजप कार्यकर्ते चेतन तिवारी व राहुल लोखंडे यांनी विद्यार्थिनींना कपड्यांचे वाटप केले.

 

मंडळ क्रमांक ४ अंतर्गत दत्त मंदिर, सद्गुरू नगर येथे प्रभाग क्रमांक १६ च्या नगरसेवकांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा नीतूताई परदेशी यांच्या वतीने कामगार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या पुढाकाराने सिंधी कॉलनी सेवा मंडळासमोर नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते.

दरम्यान, आमदार राजूमामा भोळे यांनी वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी किंवा जाहिरातींवर खर्च न करता समाजोपयोगी कार्यात सहभागी होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. दिनांक २१ जून रोजी गरजू विद्यार्थ्यांना भव्य वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ किंवा जाहिराती न देता जास्तीत जास्त वह्या जमा कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. या वह्या भाजप कार्यालय जी.एम. फाउंडेशन येथे चिटणीस मिलिंद चौधरी यांच्याकडे जमा करण्याचे सांगण्यात आले आहे.

या कार्यक्रमांना भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमालाताई काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नितीन लड्डा, प्रकाश बालानी, माजी महापौर सीमाताई भोळे, माजी अध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, भारतीताई सोनवणे, राहुल वाघ, जयेश भावसार, नितीन इंगळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावभाजपरक्तदानशिबिरराजूमामाभोळेवाढदिवससुरेश भोळे
Previous Post

राज्याचे सीईटी सहायता केंद्र केसीई कॉलेजात सुरू

Next Post

महायुतीच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महायुतीच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

महायुतीच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif