• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मुलाने चोरलेले ५ महागडे मोबाइल,अनं आईने जमा केले पोलिस ठाण्यात!

गुन्हेगारीच्या गर्तेतून मुलाला बाहेर काढण्यासाठी आईने घेतला निर्णय

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 11, 2026
in जळगाव, क्राईम
मुलाने चोरलेले ५ महागडे मोबाइल,अनं आईने जमा केले पोलिस ठाण्यात!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – मुलगा चुकीच्या मार्गाला लागू नये म्हणून जळगावातील एका प्रामाणिक आईने आपल्या १६ वर्षीय मुलाने चोरी केल्यानंतर घरात लपवून ठेवलेले ५ महागडे मोबाइल पोलिस ठाण्यात जमा केले. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी नवीन बसस्थानक परिसरातून प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. मुलाच्या गुन्ह्यावर पांघरूण न घालता त्याला धडा शिकवणाऱ्या मातेची शहरात चर्चा रंगली आहे.

अल्पवयीन मुलाने बसस्थानकातून चोरलेले हेच ते ५ मोबाइल.

आईच्या धाडसाचे जिल्हापेठ पोलिसांकडून कौतुक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नव्हता. त्याने पहिल्यांदाच चोरी केली; मात्र आईने दाखवलेल्या धाडस व प्रामाणिकपणामुळे हा मुलगा अट्टल गुन्हेगार होण्यापासून वेळीच वाचला. त्याच्या आईच्या धाडसाचे पोलिसांकडूनही कौतुक होत आहे.

 

नवीन बस स्थानक परिसरात २९ मे रोजी संकेत सुरेश नारखेडे हे आले होते. बसमध्ये चढताना-उतरताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत अल्पवयीन चोरट्याने नारखेडे यांच्या पॅन्टच्या खिशातून १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा महागडा आयफोन चोरला होता. याप्रकरणी ४ जून रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवीन बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बंद व पोलिस चौकीत पोलिस कर्मचारीही हजर नसल्याचा फायदा घेऊन हा मुलगा गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांचे मोबाइल चोरत होता. मोबाइल चोरी केल्यानंतर हा मुलगा ते घरात चोरून लपवून ठेवत होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्याच्या आईने त्याच्यावर पाळत ठेवली. मुलगा घरात काहीतरी लपवत असल्याचे आईच्या मीक्ष्ण नजरेतून सुटले

 

नाही. तिने घरात तपासणी केली असता तिला एकामागून एक तब्बल ५ महागडे मोबाइल सापडले. मुलाने चोरीचा रस्ता पकडल्याचे लक्षात येताच या माउलीने जराही वेळ न घालवता ते ५ ही मोबाइल जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून जमा केले. आईनेच पोलिसांसमोर चोरी उघड केल्याचे समजताच घाबरलेला मुलगा घरातून बेपत्ता झाला. तर दुसरीकडे जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तपास चक्र फिरवून ९ जून रोजी या अल्पवयीन मुलाला शोधू त्याला ताब्यात घेत कायदेशीर नोटीस बजावली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस कर्मचारी रवींद्र ठाकरे हे करीत आहे. दरम्यान, जमा केलेल्या मोबाइलमधून संकेत नारखेडे यांच्या मोबाइलची ओळख पटली असून, पोलिस आता उर्वरित मोबाइलच्या मालकांचा शोध घेत असून, मोबाइल मालकांनी पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.

बातमी शेअर करा !
Tags: अल्पवयीन चोरटाजळगावजिल्हापेठ पोलीसप्रामाणिक आईबसस्थानक चोरीमोबाईल चोरी
Previous Post

शहरातील वीज समस्यांवर तोडगा काढा बैठकीत कारवाईचे आदेश!

Next Post

राज्याचे सीईटी सहायता केंद्र केसीई कॉलेजात सुरू

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

राज्याचे सीईटी सहायता केंद्र केसीई कॉलेजात सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif