• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी आदित्य जीवने यांची नियुक्ती

राज्य शासनाच्या आयएएस बदल्यांमध्ये ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली; तरुण अधिकारी आदित्य जीवने यांच्याकडे जळगाव महापालिकेची धुरा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 9, 2026
in जळगाव, स्थानिक बातम्या
जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी आदित्य जीवने यांची नियुक्ती
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर अखेर आज शिक्कामोर्तब झाले. राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले असून, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी २०२१ बॅचचे आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांची नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

सध्या आदित्य जीवने हे छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणमध्ये संयुक्त संचालक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. प्रशासनातील अभ्यासू, ऊर्जावान आणि आधुनिक कार्यपद्धती स्वीकारणारे अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे जळगावकरांच्या अपेक्षेने पाहिले जात आहे.

दरम्यान, विद्यमान आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची पुढील नियुक्ती नेमकी कुठे करण्यात आली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शासनाच्या या अचानक निर्णयामुळे महापालिका प्रशासनात हालचालींना वेग आला असून, नव्या आयुक्तांच्या पदग्रहणाची तयारी सुरू झाली आहे.

शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, अतिक्रमण आणि विकासकामांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आदित्य जीवने कोणती भूमिका घेतात, याकडे आता संपूर्ण जळगावचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: आदित्य जीवनेआयएएस अधिकारीजळगावज्ञानेश्वर ढेरेप्रशासनमहापालिका
Previous Post

एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोपीच्या घरावर चालला बुलडोझर!

Next Post

आहुजा नगरात घाणीचे साम्राज्य !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आहुजा नगरात घाणीचे साम्राज्य !

आहुजा नगरात घाणीचे साम्राज्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif