• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 6, 2026
in जळगाव, आरोग्य
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : वय अवघे १२ वर्षे….हातात पुस्तके असण्याऐवजी मित्रांच्या साथसंगतीमुळे मद्याची बाटलीच आली. मद्यासोबतच गांजाचे सेवन करू लागलेल्या बालकाच्या सवयीमुळे संपुर्ण कुंटुंबच हादरले. अशा परिस्थितीत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या मानसोपचार तज्ञांच्या पुढाकारामुळे १२ वर्षीय बालकाच्या आयुष्यात व्यसनमुक्तीचा आशेचा किरण दिसून आला. रूग्णालयातील औषधोपचार आणि समुपदेशनामुळे प्रकृतीत सुधारणा होऊन बालकाचे मन पुन्हा पुस्तकांकडे वळू लागले आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील दादावाडी परिसरात राहणार्‍या १२ वर्षीय बालक हा शालेय शिक्षण घेतो. शिक्षण घेत असतांना अचानक दुर्गुणांची संगत त्याला भेटली. या संगतीमुळे तो मद्य प्राशन करू लागला. मद्याची झिंग चढत नाही म्हणून त्याने गांजा देखील ओढून पाहीला. त्यानंतर सोल्युशनचाही नशा त्याला जडला. अशा विविध नशायुक्त पदार्थांच्या व्यसनाच्या गर्तेत बुडालेल्या या १२ वर्षीय बालकाचा स्वभाव चिडचिडा झाला. त्याचे दैनंदिन जेवण देखील कमी झाले. त्यामुळे त्याच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ लागला. मुलाच्या या सवयीमुळे संपुर्ण कुटुंबच हादरले. त्याच्या पालकांनी तातडीने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मुलाला उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी डॉ. हुमेद महाडिक, डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. ऋचिता आटे, डॉ. सोनाजी गायके, डॉ. निकिता खाटवानी, डॉ. अभिलाषा राठोड, डॉ. फरीन सुरैय्या, डॉ. रेशल श्रीवास्तव यांच्या टीमने बालकाची तपासणी केली. त्याचा सीटी स्कॅन तपासणीही करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले. यासोबतच त्याचे समुपदेशनही करण्यात आले. औषधोपचार आणि समुपदेशनामुळे बालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तसेच व्यसनांपासून मन वळविण्यासाठी त्याला इतर कलाकृती शिकविण्यात आल्या. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ञ डॉक्टरांच्या पुढाकारामुळे बालकाच्या जीवनात आशेचा किरण दिसूू लागला आहे.

कोट…

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या बालकाला संगतीतील मित्रांमुळे व्यसनाची सवय जडली होती. आजुबाजूला जसे वातावरण असते तसाच प्रभाव आपल्या मनावर पडत असतो. या बालकाच्या बाबतीत असेच दिसून आले. त्यामुळे औषधोपचार आणि समुपदेशन अशा दोन्ही पध्दतींचा उपचारासाठी उपयोग करण्यात आला. त्यामुळे बालकावर करण्यात आलेले उपचार यशस्वी ठरले.

– डॉ. देवांश गणात्रा, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

बातमी शेअर करा !
Tags: गांजा सेवनबालकमद्य व्यसनमानसोपचारव्यसनमुक्तीसमुपदेशन
Previous Post

संकटमोचकांच्या गडाला हादरा! गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026
संकटमोचकांच्या गडाला हादरा! गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश!

संकटमोचकांच्या गडाला हादरा! गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश!

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
मुलुख मैदान तोफ ते विकासपुरुष “पालकमंत्री गुलाबरावजी पाटील”

मुलुख मैदान तोफ ते विकासपुरुष “पालकमंत्री गुलाबरावजी पाटील”

June 5, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif