• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन!

१ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ पदाची घोषणा.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 30, 2026
in Uncategorized, कृषी, जळगाव ग्रामीण
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव, दि. ३० – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेती, कृषी उद्योजकता आणि नेतृत्व कौशल्य विकसित करणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) या संस्थेच्या १२ व्या वार्षिक अधिवेशनात संस्थेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून शाबोर्नी पोद्दार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यंदाचे अधिवेशन तीन टप्प्यात जैन हिल्स येथे १ ते ८ जून २०२६ दरम्यान होणार आहे.

 

जैन इरिगेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या अधिवेशनात सुमारे १,५०० विद्यार्थी, ९० कृषी शिक्षक, १८ माजी विद्यार्थी आणि फालीला पाठबळ देणाऱ्या १० कंपन्यांतील ७० हून अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. सहभागी विद्यार्थी हे फाली-१२ अंतर्गत २१० शाळांमध्ये आयोजित व्यवसाय मॉडेल व कृषी तंत्रज्ञान नवकल्पना स्पर्धांचे विजेते आहेत.

फाली हा इयत्ता ८ वी आणि ९ वीतील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राबविला जाणारा अनोखा कार्यक्रम असून, आधुनिक आणि शाश्वत शेतीसाठी आवश्यक तांत्रिक, व्यावसायिक व नेतृत्व कौशल्ये विकसित करण्यावर त्याचा भर आहे. वर्गातील संवादात्मक सत्रे, आधुनिक कृषी प्रकल्पांना भेटी, उद्योगतज्ज्ञांशी संवाद आणि कृषी व्यवसायाची प्रत्यक्ष ओळख या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

 

कृषी उद्योजकतेला चालना देण्यासाठी फालीचा विस्तार..

फाली-१२ उपक्रमाला जैन इरिगेशन, गोदरेज ॲग्रोव्हेट, यूपीएल, आयटीसी, स्टारअ‍ॅग्री, प्रॉम्प्ट डेअरीटेक, एसबीआय फाउंडेशन, टाटा रॅलिस आणि ओम्निवोर या अग्रगण्य कृषी व वित्तीय संस्थांचे सक्रिय सहकार्य लाभले आहे. संस्थेच्या आगामी योजनांमध्ये दरवर्षी २५ टक्के वाढ साधत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि आणखी तीन राज्यांमध्ये विस्तार करणे, माजी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, बीजभांडवल व मार्गदर्शन कार्यक्रम वाढविणे तसेच शहरी युवकांसाठी ‘FALI e+’ उपक्रमाचा विस्तार करून कृषी उद्योजकतेला चालना देणे यांचा समावेश आहे.

 

फालीच्या सीईओपदी शाबोर्नी पोद्दार

संस्थेच्या स्थापनेपासून २०१४ पासून सीईओ पदाची जबाबदारी सांभाळणारे हर्ष नौटियाल १ जूनपासून कृषी उद्योजकतेच्या नव्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी पदमुक्त होणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली फालीने महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रभावी आणि परिवर्तनकारी उपक्रम उभा केला. तसेच देशातील अग्रगण्य कृषी कंपन्यांशी आर्थिक व तांत्रिक भागीदारी निर्माण करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नवीन सीईओ शाबोर्नी पोद्दार यांना कृषी, ग्रामीण विकास आणि सामाजिक क्षेत्रातील दहा वर्षांहून अधिक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी भारतातील अग्रगण्य ॲग्रीटेक इम्पॅक्ट फंड ओम्निवोर येथे विपणन व तांत्रिक सेवांचे नेतृत्व केले आहे. तसेच मायक्रोसेव्ह कन्सल्टिंगमध्ये अन्न, शिक्षण, ग्रामीण वित्त आणि विकास क्षेत्रातील विविध प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद (IRMA) येथून एमबीए तसेच पत्रकारितेतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

 

फाली भारतीय शेतीचे भविष्य असल्याचे मान्यवरांचे मत…

फाली असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जैन यांनी फालीच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करताना शाबोर्नी पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली संस्था आणि माजी विद्यार्थी कार्यक्रम अधिक व्यापक होतील, असा विश्वास व्यक्त केला. हवामान-स्मार्ट शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यसाखळीची कार्यक्षमता वाढविणे हे भारतीय शेतीचे भविष्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

तर नादिर गोदरेज यांनी फालीच्या माजी विद्यार्थी कार्यक्रमाच्या विस्तारासाठी मोठी संधी असल्याचे सांगितले. राज्जू श्रॉफ यांनी फालीमुळे तरुणांमध्ये तांत्रिक, व्यावसायिक आणि नेतृत्व कौशल्यांचा विकास होत असून ते भारतीय शेतीतील उत्पादकता वाढ व हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम होतील, असे मत व्यक्त केले. फालीच्या उपाध्यक्षा आणि एनबीए एंटरप्राइज सोल्युशन्स टू पॉव्हर्टीच्या अध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी शाबोर्नी पोद्दार यांच्या नेतृत्वामुळे फालीची कृषी व कृषी उद्योजकतेची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.

 

बातमी शेअर करा !
Tags: कृषीउद्योजकताग्रामीणविद्यार्थीजळगावजैनहिल्सफाली१२फालीअधिवेशन
Previous Post

महिलांच्या आरोग्य हक्कांविषयी जनजागृतीसाठी परिसंवाद!

Next Post

जागतिक दर्जाच्या संधींसाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करावे – आ. सुरेश भोळे

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जागतिक दर्जाच्या संधींसाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करावे – आ. सुरेश भोळे

जागतिक दर्जाच्या संधींसाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करावे – आ. सुरेश भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif