• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात!

९८ गावांमध्ये नेत्र तपासणी शिबिरे; ४४५ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 28, 2026
in Uncategorized, आरोग्य, जळगाव
रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव — डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालया तर्फे रावेर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून हे अभियान आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.११ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत रावेर तालुक्यातील तब्बल ९८ गावांमध्ये नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये आतापर्यंत ३०५४ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून ६४८रूग्ण शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले होते त्यापैकी ४४५ रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे,५ एचआयव्ही आणि हिपॅटायटिस-बी बाधित रुग्णांवरही सर्व आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करून यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

 

त्यामुळे गंभीर संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांनाही सुरक्षित व गुणवत्तापूर्ण उपचाराचा लाभ मिळाला.या अभियानामध्ये नेत्र विभागासोबतच इतर विविध विभागांतील रुग्णांचीही तपासणी करण्यात येत असून अनेक रुग्णांना योग्य उपचार व आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या रुग्णांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करून मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार करण्यात आले.

 

ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे तसेच दृष्टीदोषाने त्रस्त रुग्णांसाठी हे अभियान मोठा दिलासा ठरत आहे. रावेर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.या अभियानासाठी डॉ. एन एस आर्विकर,डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची विशेष टीम कार्यरत आहे. यात मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका शिबिराचे समन्वय डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. संकेत पाटील, डॉ. नेहा नारखेडे, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे यांचा समावेश आहे. तसेच सबा शेख, प्रतिक्षा सुटे, तृप्ती भोयरकर, स्वाती खरे, खुशी कांबळे आणि संजय महाजन यांनीही अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

 

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अभियानाच्या अंतिम टप्प्यात आता रावेर शहरात प्रभागानुसार दि २८ व ३० मे शिबिर होणार असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रावेर तालुक्यात राबविण्यात आलेल्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे एचआयव्ही व हिपॅटायटिस-बी बाधित रुग्णांवरही सर्व सुरक्षा उपायांचे पालन करून सुरक्षित शस्त्रक्रिया करण्यात आल्या. भविष्यातही ग्रामीण भागात अशाच आरोग्यसेवा अभियानांना प्राधान्य देत ‘मोतीबिंदूमुक्त रावेर’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. माजी खा.डॉ उल्हास पाटील अध्यक्ष गोदावरी फॉउंडेशन जळगाव.

 

 

ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत अत्याधुनिक आरोग्यसेवा पोहोचवणे हीच आमची खरी सामाजिक बांधिलकी आहे. रुग्णांना तपासणीपासून शस्त्रक्रिया आणि पुढील उपचारांपर्यंत संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आतापर्यंत हजारो रुग्णांची तपासणी करून शेकडो यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून अनेक ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळाली आहे.रूग्णांचे समाधान हीच आमच्या कामाची पावती आहे.

मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका शिबिराचे समन्वय डॉ. नि. तु. पाटील,

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्य_शिबिरजळगावनेत्र_तपासणीमोतीबिंदूमोतीबिंदू_मुक्त_रावेरमोफत_शस्त्रक्रिया
Previous Post

जळगाव महापालिकेत वजनकाटा बसवण्यात भ्रष्टाचार!

Next Post

प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार!

प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन आरोपी पसार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif