• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव महापालिकेत वजनकाटा बसवण्यात भ्रष्टाचार!

उपमहापौर मनोज चौधरी यांचे आरोप!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 27, 2026
in जळगाव, महापालिका, विशेष बातमी
जळगाव महापालिकेत वजनकाटा बसवण्यात भ्रष्टाचार!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेत वजनकाटा बसवतांना मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप महापालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी केला आहे. ५ लाख ७१ हजार रुपयात ५० टन क्षमतेचा वजन काटा बसविण्यात येत असतांना महापालिकेने ९ लाख ५० हजार रुपये खर्च करून ३० टन क्षमतेचा वजन काटा बसविला आहे. दोन ठिकाणी हे वजन काटे बसविण्यात आले असून यात ७ लाख ५८ हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.

 

नगरपालिका व महानगरपालिकांना ५० टन क्षमतेचा वजन काटा बसविण्याचे निर्देश शासनाने दिले असतांना जळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र ३० टन क्षमतेचा दोन वजन काटे बसवले.मनपाच्या टी.बी हॉस्पीटल येथे एक वजन काटा बसविण्यात आला होता तर दुसरा वजन काटा हा महापालिकेचा कचरा डेपो (डंम्पिग ग्राऊडवर) वर बसवण्यात आला होता. परंतु काही काळानंतर टीबी हॉस्पीटलच्या जागेवरील वजन काटा बंद करण्यात आला. त्या ठिकाणी ई-बसचे चार्जिंग स्टेशन तयार करण्यात येणार असल्यामुळे तो वजन काटा काढण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले मात्र, तेथील काटा कुठे गेला याबाबत उत्तर पदाधिकाऱ्या दिले जात नाही, तसेच तेथील काटा दोन वर्षापासून बंद असल्यामुळे एका खासगी वजनकाट्यावर कचऱ्याचे वजन केले जात आहे. त्यामुळे महापालिकेकडून आतापर्यंत त्या खासगी काटा मालकाला लाखो रुपये महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

 

मागील सहा ते सात महिन्यात मनपाने खासगी वजन काटा मालकाला १३ लाख ३७ हजार रुपये अदा केले असून आणखी दोन ते तीन महिन्यांचे बिल देणे बाकी आहे. इतका पैसा मनपाने त्या खासगी काटा मालकाला देण्यापेक्षा स्व:त नवीन वजन काटा बसवला असता तर, वर्षभराच्या बिलाच्या किंमतीत मनपाचे दोन ५०-५०टन क्षमतेचे वजन काटे बसले असते, तरी महापालिकेने स्वत:चे वजन काटे का बसवले नाही, असा प्रश्न उपमहापौर मनोज चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

 

मनपाचा काटा दुरुस्तीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष

महापालिकेने डम्पिंग ग्राऊडवर बसवलेला काटा अनेक वर्षापासून बंद स्थितीत आहे. तो वजन काटा दुरुस्त करण्यासाठी ३ लाख ९७ हजार रुपये खर्च करावा लागणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे खासगी वजन काट्याचे १३ लाख रुपये अदा करण्यासाठी महापालिकेकडे पैसे आहेत परंतु स्वत:चा वजन काटा दुरुस्त करण्यासाठी पैसे नाही का? असा सवाल उपमहापौरांनी उपस्थित केला आहे. स्वत:चा वजन काटा दुरुस्त केल्यास मनपाच्या अधिकाऱ्यांना त्यात पैसे मिळणार नसून दुसऱ्यांच्या वजन काट्यावर वाहनांचे वजन केल्यास त्यात पाहिजे तसा भ्रष्टाचार करता येवू शकतो म्हणून हा फंडा राबविला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

दोन कर्मचारी १५ दिवसांपासून गायब

मनपाच्या इमारतीत ८ कर्मचारी आहेत. त्यापैकी २ कर्मचारी १५ दिवसांपासून सुटी न टाकता गैर हजर आहेत. त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी दोन मुकादम नियुक्त आहेत. तरी त्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही आरोग्य विभागाकडून करण्यात आली नाही, याचाच अर्थ आरेाग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा प्रकार सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनपा आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी उपमहापौरांनी केली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: आरोग्य विभागउपमहापौर मनोज चौधरीकचरा डेपोजळगाव महापालिकामनपा भ्रष्टाचारवजनकाटा घोटाळा
Previous Post

अर्ज विक्रीत मोठी चुरस; नावांबाबत प्रशासनाची मौन भूमिका

Next Post

रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात!

रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif