• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा!

शिबिरार्थींनी केले ‘श्यामची आई’ पुस्तकाचे वाचन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 25, 2026
in जळगाव, शैक्षणिक
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

विटनेर : मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय कमी होत असताना, वाचन संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित युवा संस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ‘रोटरी वाचन कट्टा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विटनेर येथील डॉ. निलेश (जैन) ब्रह्मेचा माध्यमिक विद्यालय येथे झालेल्या या उपक्रमात ३८ शिबिरार्थींनी श्यामची आई या प्रेरणादायी पुस्तकाचे सामुहिक वाचन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एका शिबिरार्थ्याने साने गुरुजी यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने ‘श्यामची आई’मधील एक परिच्छेद वाचून दाखवत पुस्तकातील संस्कार, प्रेम, त्याग आणि माणुसकीचे विचार अनुभवले.

यावेळी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. “वाचाल तर वाचाल” या उक्तीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. पुस्तके ही माणसाची खरी मित्र असून चांगले साहित्य विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य करते, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, अर्जुन प्रसाद, प्रशांत सुर्यवंशी, विक्रम अस्वार, मयूर गिरासे, चंद्रकांत चौधरी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी संकल्प चांगला माणूस बनण्याचा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. पुस्तकांद्वारे संस्कार आणि जीवनमूल्ये जपण्याचा संदेश उपक्रमातून देण्यात आला.

बातमी शेअर करा !
Tags: गांधी रिसर्च फाऊंडेशनयुवा संस्कार शिबिररोटरी वाचन कट्टावाचन संस्कृतीश्यामची आईसाने गुरुजी
Previous Post

पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मधील मोठ्या ‘बाबा खोली’ नाल्याची स्वच्छता!

Next Post

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif