• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महापौरांकडून रामदास कॉलनीतील उद्यानाच्या कामाची पाहणी!

रामदास कॉलनीत होणाऱ्या उद्यानाच्या कामाचा महापौर दीपमाला काळे यांनी घेतला आढावा; प्रकाश व्यवस्था, ठिबक सिंचन व दर्जेदार कामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 23, 2026
in जळगाव, विकासकामे
महापौरांकडून रामदास कॉलनीतील उद्यानाच्या कामाची पाहणी!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :शहरातील रामदास कॉलनी भागात प्रस्तावित उद्यानाच्या (बगीचा) जागेची जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी (दि. २२ मे) प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला आणि उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

महापौर दीपमाला काळे यांनी उद्यानाच्या जागेवर जाऊन सुरू असलेल्या कामांची बारकाईने पाहणी केली. कामकाजातील छोट्या-छोट्या आणि महत्त्वपूर्ण बाबी जाणून घेत, हे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी प्रभाग क्रमांक १२ मधील स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये नगरसेवक नितीन बरडे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेविका गायत्री राणे, अनिल अडकमोल या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रभागातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या उद्यानाच्या कामाबाबत काही महत्त्वपूर्ण सूचना मनपा अधिकाऱ्यांकडे मांडल्या. याशिवाय नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांचीही याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

उद्यानामध्ये आवश्यक असलेली चोहोबाजूने प्रकाश व्यवस्था, उद्यानात जे नवीन वृक्षारोपण केले जाणार आहेत त्या सर्वांना ठिबक पद्धतीने पाणी दिले जावे अशा महत्त्वपूर्ण सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना केल्या आहे. उद्यानाच्या कामात विविध विभागांचा समन्वय राहावा, यासाठी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारीही या दौऱ्यात सहभागी झाले होते.

यामध्ये शहर अभियंता योगेश बोरोले, विद्युत विभागाचे संदीप मोरे, पाणीपुरवठा विभागाचे घृष्णेश्वर साळुंखे, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे ठेकेदार आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते. महापौरांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना परस्परांशी समन्वय साधून उद्यानाचे काम गतीने मार्गी लावण्याचे आदेश दिले आहेत. या उद्यानामुळे रामदास कॉलनी परिसरातील नागरिकांना एक चांगल्या दर्जाची विरंगुळ्याची जागा उपलब्ध होणार आहे.

बातमी शेअर करा !
Tags: गार्डनप्रोजेक्टजळगावन्यूजदीपमालाकाळेमनपाबातमीरामदासकॉलनीविकासकामे
Previous Post

जळगावच्या रजत सावदेकर यांची अमेरिकेत शैक्षणिक भरारी; MS पदवी डिस्टिंक्शनसह संपादन!

Next Post

बारावीच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रांचे २६ मे रोजी वाटप

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
बारावीच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रांचे २६ मे रोजी वाटप

बारावीच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रांचे २६ मे रोजी वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif