• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

उपनिबंधकाच्या लॉकरमधून तब्बल १.७ कोटींचा मुद्देमाल जप्त!

सहकार विभागातील वर्ग-१ अधिकाऱ्यावर एसीबीची मोठी कारवाई; लॉकरमधून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि चांदीचा ऐवज जप्त

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 23, 2026
in क्राईम, जळगाव
उपनिबंधकाच्या लॉकरमधून तब्बल १.७ कोटींचा मुद्देमाल जप्त!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या सहकारी संस्थांच्या उपनिबंधकाच्या लॉकरमधून तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

आरोपी जगदीश बाबुराव बारी (वय ५६, रा. शांतीनगर, यावल रोड, भुसावळ) हे सहकार विभागातील वर्ग-१ अधिकारी असून त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० रोजी त्यांच्यावर यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, आरोपीच्या घरझडतीदरम्यान कॉसमॉस बँक, भुसावळ येथे लॉकर असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार दोन पंचांच्या उपस्थितीत लॉकरची झडती घेण्यात आली. या झडतीत ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या व सोन्याचे बिस्किट असा ९९ लाख ४ हजार ९६० रुपये किमतीचा ऐवज मिळाला. तसेच ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम आणि २ हजार ६२५ रुपये किमतीचे चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले.

एकूण १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो विभागाने ताब्यात घेतला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलीस हवालदार संगिता पवार, पोलीस कर्मचारी प्रदीप पोळ, मनोज पाटील, अमोल सूर्यवंशी आणि चंद्रशेखर चौधरी यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा !
Tags: उपनिबंधकएसीबीकारवाईजळगावभुसावळभ्रष्टाचारसहकारविभाग
Previous Post

बोदवड खून प्रकरणात हलगर्जीपणा भोवला; तीन पोलीस अधिकारी-कर्मचारी निलंबित!

Next Post

जळगावच्या रजत सावदेकर यांची अमेरिकेत शैक्षणिक भरारी; MS पदवी डिस्टिंक्शनसह संपादन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावच्या रजत सावदेकर यांची अमेरिकेत शैक्षणिक भरारी; MS पदवी डिस्टिंक्शनसह संपादन!

जळगावच्या रजत सावदेकर यांची अमेरिकेत शैक्षणिक भरारी; MS पदवी डिस्टिंक्शनसह संपादन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif