• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

बोदवड खून प्रकरणात हलगर्जीपणा भोवला; तीन पोलीस अधिकारी-कर्मचारी निलंबित!

वाढता वाद वेळेत न रोखल्याचा ठपका; विभागीय चौकशीत पोलिसांच्या निष्क्रियतेवर ताशेरे

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 22, 2026
in Uncategorized, क्राईम, जळगाव ग्रामीण
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

तालुक्यात घडलेल्या हत्या प्रकरणानंतर बोदवड पोलीस ठाण्याच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यात झालेल्या निष्काळजीपणामुळे तीन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विभागीय चौकशीत वेळेत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सुरवडकर, एएसआय रविंद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. संबंधित वादप्रकरणात दोन्ही गटांमधील वाढता तणाव लक्षात घेऊनही आवश्यक कायदेशीर पावले उचलण्यात पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

माहितीनुसार, दोन्ही गटांतील वादाची माहिती पोलीस प्रशासनाला आधीच मिळाली होती. प्रतिबंधात्मक कारवाईची जबाबदारी असतानाही आवश्यक चौकशी व कठोर उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी परिसरातील वातावरण अधिक तणावपूर्ण बनले आणि पुढे हत्या सारखी गंभीर घटना घडली.

चौकशी अहवालानुसार, टाऊन बीट प्रभारी एएसआय रविंद्र गुरचळ यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आले. याचवेळी कठोर कारवाई केली असती तर पुढील अनर्थ टाळता आला असता, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रभारी अधिकारी दिपक सुरवडकर यांनाही संपूर्ण वादाची माहिती फोन व व्हॉट्सअॅपद्वारे देण्यात आली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही परिस्थितीची गंभीरता त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तरीही त्यांनी स्वतः कोणतीही तातडीची कारवाई केली नाही किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळेत माहिती दिली नसल्याचे चौकशीत समोर आले.

तीन्ही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आणि अखेर गंभीर गुन्हा घडल्याचा ठपका विभागीय अहवालात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित तिघांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून पुढील विभागीय चौकशी सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Tags: दिपक सुरवडकरनंदकिशोर धनकेपोलीस निलंबनबोदवडरविंद्र गुरचळहत्या प्रकरण
Previous Post

मनपाचा महसूल वाढवण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडमध्ये!

Next Post

उपनिबंधकाच्या लॉकरमधून तब्बल १.७ कोटींचा मुद्देमाल जप्त!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
उपनिबंधकाच्या लॉकरमधून तब्बल १.७ कोटींचा मुद्देमाल जप्त!

उपनिबंधकाच्या लॉकरमधून तब्बल १.७ कोटींचा मुद्देमाल जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif