• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मनपाचा महसूल वाढवण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडमध्ये!

नवीन घरांचे तात्काळ सर्वेक्षण करा; घरपट्टी नोंदणी पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 22, 2026
in जळगाव, तपासणी, महापालिका
मनपाचा महसूल वाढवण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडमध्ये!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील नव्याने उभ्या राहिलेल्या अनेक घरांची अद्याप घरपट्टी आकारणी न झाल्याने महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेत महसूल वाढीसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले.

दि. २१ मे रोजी उपमहापौर मनोज चौधरी यांच्या दालनात उपायुक्त शिंदे मॅडम, हाऊस टॅक्स विभागीय अधिकारी, प्रभाग अधिकारी, टी.पी. अधिकारी तसेच नवीन घर मॅपिंग संबंधित कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत शहरातील नवीन बांधकामांचे सर्वेक्षण, घरपट्टी नोंदणी आणि महसूल वाढ यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत सांगितले की, घर मॅपिंगसाठी महानगरपालिकेमार्फत करोडो रुपयांची एजन्सी नियुक्त करण्यात आली असताना अपेक्षित दर्जाचे काम होत नाही. अनेक नवीन बांधकामांची माहिती अद्याप नोंदवली गेलेली नसल्याने मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे.

संबंधित एजन्सीने जबाबदारीने व काटेकोरपणे काम करून प्रत्येक नवीन बांधकामाची अचूक माहिती संकलित करावी व तत्काळ घरपट्टी आकारणी करण्यात यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशाराही उपमहापौरांनी दिला.

महानगरपालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाने अधिक सक्षम, पारदर्शक व जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे मतही बैठकीत व्यक्त करण्यात आले.

बातमी शेअर करा !
Tags: उपमहापौरघरपट्टीजळगावमनपामनोज चौधरीमहसूल
Previous Post

पीडब्ल्यूडीतील १५ लाखांच्या लाच प्रकरणाला नवे वळण!

Next Post

बोदवड खून प्रकरणात हलगर्जीपणा भोवला; तीन पोलीस अधिकारी-कर्मचारी निलंबित!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

बोदवड खून प्रकरणात हलगर्जीपणा भोवला; तीन पोलीस अधिकारी-कर्मचारी निलंबित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif