• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पीडब्ल्यूडीतील १५ लाखांच्या लाच प्रकरणाला नवे वळण!

थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल; अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांच्या भूमिकेवरही संशय

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 22, 2026
in जळगाव, विशेष बातमी
पीडब्ल्यूडीतील १५ लाखांच्या लाच प्रकरणाला नवे वळण!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) कथित भ्रष्टाचार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत अटक झालेल्या शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्यासोबतच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे.

मुविकोराज मुरलीधर कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीत शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्यासह अधीक्षक अभियंता प्रशांत पी. सोनवणे आणि कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागात विविध कामांची बिले मंजूर करण्यासाठी तसेच फाईल पुढे सरकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर आर्थिक मागण्या केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विनोबानगर परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे अंतिम बिल मंजूर करण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाखा अभियंता योगेश अहिरे यांना ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती. संबंधित ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली होती. कार्यालयाबाहेरील कारमध्ये रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न सुरू असतानाच एसीबीच्या पथकाने धडक कारवाई केली होती.

तक्रार अर्जात या प्रकरणामागे वरिष्ठ स्तरावरील साखळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: एसीबीजळगावपीडब्ल्यूडीभ्रष्टाचारलाच प्रकरणसार्वजनिक बांधकाम विभाग
Previous Post

आईच्या कुशीत पुन्हा उमलले दोन जीव!

Next Post

मनपाचा महसूल वाढवण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडमध्ये!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मनपाचा महसूल वाढवण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडमध्ये!

मनपाचा महसूल वाढवण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडमध्ये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif