• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; भाजप-शिवसेनेत उमेदवारीसाठी चुरस वाढली!

डॉ केतकी पाटील, प्रतापराव पाटील व नंदू अडवणी यांचे नाव चर्चेत; १८ जून रोजी मतदान, २२ जूनला मतमोजणी; इच्छुकांकडून लॉबिंगला वेग 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 19, 2026
in जळगाव, निवडणूक
जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; भाजप-शिवसेनेत उमेदवारीसाठी चुरस वाढली!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्यLive न्यूज नेटवर्क- जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भारतीय निवडणूक आयोगाने प्रदीर्घ काळ रिक्त असलेल्या विधान परिषद जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, जळगाव मतदारसंघासाठी येत्या १८ जून २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे.माजी आमदार चंदूभाई पटेल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी आता नव्या चेहऱ्यांकडून जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीसह विविध पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढत असून, पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंगला वेग आला आहे.

या निवडणुकीत नव्याने निवडून आलेले महापालिका नगरसेवक, नगरपालिका व नगरपंचायतीचे सदस्य तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष मतदान करणार आहेत. मात्र, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना मतदानाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपाकडून नंदू अडवाणी, नंदू महाजन तसेच माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील, रोहित निकम, सुनील भंगाळे,यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. दुसरीकडे शिवसेनेकडूनही या जागेवर दावा करण्यात येत असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील हे देखील इच्छुक असल्याने पक्षांतर्गत हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात उमेदवारीवरून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील किमान ७५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असणे आणि किमान ७५ टक्के लोकप्रतिनिधी पदावर असणे आवश्यक असते. पूर्वी या अटी पूर्ण न झाल्याने निवडणूक रखडली होती. मात्र, आता आवश्यक निकष पूर्ण झाल्याचा अहवाल राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

 

असे आहे निवडणूक वेळापत्रक

अधिकृत अधिसूचना जारी : २५ मे २०२६

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : १ जून २०२६

अर्ज छाननी : २ जून २०२६

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ४ जून २०२६

मतदान : १८ जून २०२६

मतदानाची वेळ : सकाळी ८ ते दुपारी ४

मतमोजणी व निकाल : २२ जून २०२६

जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय रणनीती, गटबाजी आणि शक्तीप्रदर्शनाला वेग येणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #Jalgaon #जळगावमहापालिका #महिलाOBCमहापौर #MayorRace #महापौर #PoliticalNews #JalgaonNews #MunicipalPolitics #WomenLeadership #OBCReservationइच्छुकडॉ. केतकी पाटीलविधान परिषद निवडणूक
Previous Post

हुलकावणीला अनलकी करत, लकी टेलर सभापती!

Next Post

जळगावात डासांवर आक्रमक मोहीम; उपमहापौर मनोज चौधरी यांचे मलेरिया विभागाला तातडीचे निर्देश

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावात डासांवर आक्रमक मोहीम; उपमहापौर मनोज चौधरी यांचे मलेरिया विभागाला तातडीचे निर्देश

जळगावात डासांवर आक्रमक मोहीम; उपमहापौर मनोज चौधरी यांचे मलेरिया विभागाला तातडीचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif