• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 17, 2026
in जळगाव, वाणिज्य वार्ता
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव/मुंबई दि.१५ प्रतिनिधी : जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडी, पॉलिमरच्या वाढत्या किमती आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत भक्कम कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी निकालांवर भाष्य करताना महसूल, नफा आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ झाल्याचे सांगितले. जैन हिल्स येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर चौथ्या तिमाहीचा निकाल जाहिर करण्यात आला.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत ‘हाय-टेक’ आणि ‘अॅग्रो प्रोसेसिंग’ विभागांच्या मजबूत कामगिरीमुळे कंपनीने वार्षिक तुलनेत ४.३ टक्के एकत्रित महसूल वाढ नोंदवली. प्रतिकूल परिस्थितीतही कंपनीने २३३ कोटी रुपयांची रोख निर्मिती केली असून, ती EBITDA च्या जवळपास ९७ टक्के इतकी आहे.

 

संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार करता, कंपनीने एकत्रित महसुलात दुहेरी अंकी वाढ साध्य केली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मधील एकत्रित EBITDA ८०९ कोटी रुपये इतका असून, तो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १२.८ टक्क्यांनी अधिक आहे. खेळत्या भांडवलाच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे कंपनीच्या खेळत्या भांवडला मध्ये सुधारणा झाली असून, कंपनीला ६१९ कोटी रुपयांचा रोख निर्मिती करण्यात यश आले आहे. ही रक्कम EBITDA च्या सुमारे ७६ टक्के इतकी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

भविष्यात महसूल वाढीचे लक्ष्य – अनिल जैन

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनी सध्या बदलत्या जागतिक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. कच्च्या मालाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार प्रवाहावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला असला, तरी धोरणांमधील सातत्य तसेच सिंचन आणि पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च यामुळे बाजारातील मागणीला चालना मिळेल असे अपेक्षित आहे. भविष्यात महसूल वाढ, प्रकल्पांमधील येणी वसुली सुधारणा आणि शाश्वत मुक्त रोख प्रवाह निर्माण करण्यावर कंपनीचे विशेष लक्ष्य राहणार असल्याचेही कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा !
Tags: अनिल जैनउत्पन्नजैन इरिगेशनदमदार कामगिरीप्रॉफिटलक्षणीय वाढवार्षिक
Previous Post

आता मंदिरातील व घरातील निर्मल्यांचे टेन्शन मिटले!

Next Post

गिरीषभाऊ महाजन यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा उत्साहात जल्लोष

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गिरीषभाऊ महाजन यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा उत्साहात जल्लोष

गिरीषभाऊ महाजन यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा उत्साहात जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif