• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

आता मंदिरातील व घरातील निर्मल्यांचे टेन्शन मिटले!

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन:

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 17, 2026
in जळगाव, महापालिका
आता मंदिरातील व घरातील निर्मल्यांचे टेन्शन मिटले!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

            नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव शहराला लाभलेली समृद्ध धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपत, शहरातील विविध मंदिरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या निर्माल्याचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेकडून ‘समर्पण’ संस्थेच्या संयुक्त सहकार्याने शनिवार दि. १६ मे रोजी “निर्माल्य संकलन व व्यवस्थापन प्रकल्प” कार्यान्वित करण्यात आला. या अभिनव उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा’ निर्माल्याचे पावित्र्य जपत, गोळा झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प राबवणार आहे. यासाठी आवश्यक नियोजन, जनजागृती, संकलन व प्रक्रिया व्यवस्थापनात ‘समर्पण’ संस्था महापालिकेला पूर्णतः सहकार्य करत आहे.

 

या मोहिमेसाठी जळगाव महानगरपालिकेच्या वतीने विशेष ‘निर्माल्य संकलन रथ’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात रथ चौक येथील ऐतिहासिक व प्राचीन श्रीराम मंदिर संस्थान येथे या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते या विशेष निर्माल्य रथाचे पूजन करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी शहरातील स्थानिक नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके, सुनील खडके, स्थायी समिती सदस्य कल्पेश सोनवणे, ॲड. शुचिता हाडा, पियूष कोल्हे अमित काळे, स्वीकृत नगरसेवक नरेंद्र सोनवणे, हर्षल मावळे, तसेच माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त उदय पाटील आणि या प्रकल्पासाठी पुढाकार घेणाऱ्या ‘समर्पण’ संस्थेच्या चेतना नन्नवरे, पोलीस प्रभाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे, संदीप ढंढोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्माल्य रथ श्रीराम मंदिर संस्थान येथून जुने जळगावातील विठ्ठल मंदिर आणि पुढे इतर मंदिरांसाठी मार्गस्थ झाला.

प्रकल्पाचे उद्दिष्ट आणि महत्त्व

मंदिरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर गोळा होणारे निर्माल्य अनेकदा नदी-नाल्यांमध्ये किंवा कचऱ्यात फेकले जाते, ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते. निर्माल्याचे पावित्र्य राखत त्याचे उपयुक्त सेंद्रिय खतात रूपांतर करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. महापालिकेचा हा संकलन रथ नियमितपणे निर्माल्य गोळा करणार असून, नागरिकांनी आणि मंदिर प्रशासनाने आपले निर्माल्य इतरत्र न टाकता मंदिरातच जमा करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बातमी शेअर करा !
Tags: घरातीलनिर्मल्यमंदिरमहापालिकामहापौरविठ्ठल मंदिर
Previous Post

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कामगारांसाठी रुमाल वाटप!

Next Post

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif