• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव जनता सहकारी बँकेच्या ‘नेट बँकिंग’ सेवेचा शुभारंभ!

डिजिटल व्यवहारांना चालना; ग्राहकांसाठी जलद व सुरक्षित बँकिंग सुविधेची सुरुवात

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 13, 2026
in जळगाव, वाणिज्य वार्ता
जळगाव जनता सहकारी बँकेच्या ‘नेट बँकिंग’ सेवेचा शुभारंभ!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : डिजिटल बँकिंगच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत जळगाव जनता सहकारी बँक लि., जळगाव यांच्या ‘नेट बँकिंग’ सेवेचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी मुख्य कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ग्राहकांना आधुनिक, जलद आणि सुरक्षित सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

कार्यक्रमाला स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपक चौधरी आणि जळगाव जनता इन्फोटेक कंपनीचे श्री. कांतीलाल बडाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष श्री. सतीश मदाने होते.

सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविकात संचालक श्री. नितीन झंवर यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत डिजिटल सेवांचा विस्तार ही काळाची गरज असल्याचे सांगितले. ग्राहकांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या नेट बँकिंग सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

उपमहाव्यवस्थापक श्री. राजेश महाजन यांनी नेट बँकिंग सेवेची सविस्तर माहिती देत ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधांबाबत मार्गदर्शन केले. यानंतर प्रमुख पाहुणे श्री. दीपक चौधरी यांच्या हस्ते नेट बँकिंग सेवेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

आपल्या मनोगतात श्री. दीपक चौधरी यांनी डिजिटल व्यवहारांची सवय ही काळाची गरज असल्याचे नमूद करत, जळगाव जनता सहकारी बँकेने ग्राहकांसाठी सुरू केलेली ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांनी सुरक्षित आणि जलद व्यवहार करावेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

अध्यक्षीय भाषणात श्री. सतीश मदाने यांनी ग्राहक केंद्रीत सेवा देण्याच्या बँकेच्या धोरणाचा पुनरुच्चार करत, भविष्यातही ग्राहकांसाठी अधिक नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमात उपस्थित ग्राहकांनीही नव्या नेट बँकिंग सेवेबद्दल समाधान व्यक्त करत बँकेच्या या पुढाकाराचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. निलम जोशी यांनी केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय नागमोती यांनी आभार मानले.

यावेळी संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: कार्यक्रमचेअरमनजनता बँकजळगावनेट बँकिंगशुभारंभसंपन्न
Previous Post

जळगाव महसूल विभागात एसीबीचा सापळा ; मंडल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक!

Next Post

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया.

श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रमण संघ जळगावच्या अध्यक्षपदी संध्या कांकरिया.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif