• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आंतरराष्ट्रीय

तेजलला सर्वतोपरी मदत करणार – आमदार राजुमामा भोळे

तेजलचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये तबला वादनाचा विक्रम!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 11, 2026
in आंतरराष्ट्रीय, जळगाव
तेजलला सर्वतोपरी मदत करणार  – आमदार राजुमामा भोळे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगावच्या कु. तेजल सचिन जगताप हिने अल्पवयातच उल्लेखनीय कामगिरी करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे. सध्या Kendriya Vidyalaya AFS Darjipura येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या तेजलने वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सर्वाधिक वेळ न थांबता तबला वादन करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

तेजलने तब्बल २ तास, १ मिनिट आणि ४० सेकंद अखंड तबला वादन करत हा अनोखा विक्रम केला. तिच्या या कामगिरीला India Book of Records यांनी २८ एप्रिल २०२६ रोजी अधिकृत मान्यता दिली.

हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी तेजलने दररोज ३ ते ४ तास तबल्याचा कठोर रियाज केला. सलग दोन तासांपेक्षा अधिक वेळ एकाच जागी बसून तिने ताल तिनतालमध्ये पेशकार, विविध कायदे, रेले, गत, चक्रधार, परन तसेच नामवंत उस्ताद आणि पंडितांच्या बंदिशी सादर केल्या. विशेष म्हणजे, संपूर्ण सादरीकरणादरम्यान तिने एकही रचना पुन्हा वाजवली नाही.

तेजलच्या या यशामागे तिची आई गुंजन जगताप व वडील सचिन जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सचिन जगताप हे तेजलचे आद्य गुरू देखील आहेत. याशिवाय गुरु श्री. स्वप्नील भिसे (मुंबई), श्री. राजीव भट्टाचार्जी आणि डॉ. दिपेश दोढी यांचेही तिला मार्गदर्शन लाभले.

तेजल ही जळगावातील जगताप टेलर्सचे शामकांत शिंपी यांची नात असून, तिच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिने केलेल्या या बुक ऑफ रेकॉर्ड बद्दल जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी तिचे कौतुक करत तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून तिला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आमदार भोळे यांनी सांगितले. विविध स्तरांतून तेजलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सजळगाव बातम्यातबला वादनतबला विक्रमतेजल जगतापयुवा कलाकार
Previous Post

दीपस्तंभ फाऊंडेशन- मनोबलची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा येत्या ५ आणि २१ जुनला राष्ट्रीय स्तरावर होणार*

Next Post

गोलाणी मार्केट परिसरात वाहतूक शाखेची धडक कारवाई!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गोलाणी मार्केट परिसरात वाहतूक शाखेची धडक कारवाई!

गोलाणी मार्केट परिसरात वाहतूक शाखेची धडक कारवाई!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif