• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांचे यश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 9, 2026
in Uncategorized, जळगाव
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

मद्याच्या अति सेवनामुळे आयुष्य विस्कळीत झालेल्या एका तरुणाच्या उपचाराला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी योग्य दिशा देत त्याला नवजीवन दिल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील देवीदास नामक ४७ वर्षीय तरूणाला सतत मद्यपानाची सवय, वागण्यात अचानक बदल, अनियंत्रित बडबड, तसेच हातपाय थरथरणे अशा लक्षणांमुळे संबंधित तरुणाची मानसिक आणि शारीरिक स्थिती गंभीर बनली होती.कुटुंबीयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरुणाला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. हुमेद महाडीक, डॉ. ऋचिता आटे, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. रैशल श्रीवास्तव, डॉ. राठोड यांनी रूग्णाच्या प्रारंभी वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये एमआरआय तपासणीसह विविध चाचण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर संबंधित तरुणाला अल्कोहोल युज डिसऑर्डर विथ एन्झायटी डिसऑर्डर असा आजार असल्याचे निदान करण्यात आले.निदानानंतर मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने उपचाराची जबाबदारी स्वीकारली. या उपचारामध्ये औषधोपचारासोबतच समुपदेशन, मानसिक आधार आणि जीवनशैलीत बदल यावर विशेष भर देण्यात आला. सुरुवातीच्या काळात तरुणाला अस्वस्थता, चिडचिड, झोपेच्या तक्रारी जाणवत होत्या; मात्र डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली.काही दिवसांच्या उपचारानंतर तरुणाच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून आला. हातपाय थरथरणे कमी झाले, अनावश्यक बडबड थांबली आणि मानसिक स्थैर्य मिळू लागले. विशेष म्हणजे, मद्यपानाची तीव्र इच्छा देखील नियंत्रणात आली. उपचाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने संबंधित तरुण आता पूर्णपणे व्यसनमुक्त झाला असून, तो पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यास सक्षम झाला आहे.

कोट…

याबाबत मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले की, मद्याचे अतिसेवन केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करते. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अशा रुग्णांना पूर्णपणे व्यसनमुक्त करता येते. कुटुंबीयांचे सहकार्य, रुग्णाची इच्छाशक्ती आणि तज्ज्ञांचा योग्य मार्गदर्शन हा उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे.या यशस्वी उपचारामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे. – डॉ. ऋचिता आटे, डॉ.उल्हास पाटीलरूग्णालय.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावडॉउल्हासपाटीलरुग्णालयमद्यव्यसनमुक्तीमानसिकआरोग्यमानसोपचारव्यसनमुक्ती
Previous Post

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

Next Post

का.उ. कोल्हे विद्यालयाचा दहावीच्या निकालात झेंडा!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
का.उ. कोल्हे विद्यालयाचा दहावीच्या निकालात झेंडा!

का.उ. कोल्हे विद्यालयाचा दहावीच्या निकालात झेंडा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif