• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रीडा

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

डॉ. गुणवंतराव आयुर्वेद महाविद्यालयात मशाल प्रज्वलनाने महोत्सवाची दिमाखदार सुरुवात; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 9, 2026
in क्रीडा, जळगाव
आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – डॉ. गुणवंतराव आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून आरोहण २०२६ वार्षिक स्नेहसंमेलनाचा कुरुक्षेत्र या उद्घाटनपर क्रीडा स्पर्धेने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत औपचारिकरित्या मशाल प्रज्वलित करून तसेच आरोहण २०२६ चे प्रतीकात्मक फलक प्रदर्शित करून महोत्सवाच्या प्रारंभाची घोषणा केली.यावेळी त्यांचेसोबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांच्यासह प्राध्यापकवर्ग, अध्यापन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुरुक्षेत्रात विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धाचे आयोजन पुढील तिन दिवसात करण्यात आले आहे.

यात कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल यांसारख्या विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण वातावरणात निकोप स्पर्धा, मैत्री आणि उत्साहाची भावना अनुभवायला मिळत होती. महोत्सवाचे पुढील ५ दिवसात ८ ते १० मे – क्रीडा स्पर्धा,११ मे – प्रॉम नाईट,१२ मे – डी जे नाईट व नंतर सांस्कुतिक कार्यक्रमाने समारोप केला जाणार आहे.

 

विद्यार्थ्यांच्या ऊर्जा, एकता आणि खिलाडूवृत्तीचा संगम असलेल्या या सोहळ्याने संपूर्ण महाविद्यालय परिसर उत्साहाने भारून गेला. यावेळी मान्यवरांनी क्रिडा स्पर्धामूळे शारीरीक व्यायाम तसेच एकोप्याची भावना निर्माण होते. प्रत्येक स्पर्धा खिलाडूवृत्तीने घेण्याचा संदेश दिला.

बातमी शेअर करा !
Tags: आयुर्वेदमहाविद्यालयआरोहण२०२६कुरुक्षेत्रक्रीडास्पर्धाजळगावविद्यार्थीउत्सव
Previous Post

बर्ड फ्ल्यूच्या धोक्याने प्रशासन अलर्ट; उपमहापौरांची तातडीची बैठक

Next Post

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif